krk kamal r khan slams news channel anchors if he will be prime minister will put them jail-ram |  तर सर्व ड्रामेबाज टीव्ही अँकर्सना तुरुंगात डांबेल... !! अभिनेता बरळला

 तर सर्व ड्रामेबाज टीव्ही अँकर्सना तुरुंगात डांबेल... !! अभिनेता बरळला

ठळक मुद्देअगदी अलीकडे केआरकेने भारतातील राजकीय नेत्यांना लक्ष्य केले होते.

‘देशद्रोही’ या चित्रपटापासून करिअरची सुरुवात करणारा आणि पुढे स्वयंभू चित्रपट समीक्षक म्हणून मिरवणारा केआरके अर्थात कमाल आर खान पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखल्या जाणा-या केआरकेचे एक ट्विट सध्या जाम चर्चेत आहे. होय, आपल्या ट्विटमध्ये केआरकेने देशातील न्यूज चॅनलवर तोंडसुख घेतले आहे. केवळ इतकेच नाही या चॅनल्सच्या न्यूज अँकर्सना  चक्क धमकी दिली आहे.
‘मला तासाभरासाठी पंतप्रधान बनवले तर मी पहिल्यांदा या ड्रामेबाज जोकर न्यूज अँकर्सना  नेहमीसाठी तुरुंगात डांबेल. यांच्या चेह-यावर थुंकण्याची इच्छा होते,’ असे केआरकेने लिहिले.


त्याच्या या ट्विटनंतर काय झाले असावे? केआरके नेहमीप्रमाणे ट्रोल झाला. होय, लोकांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले. तू फक्त हवाबाजी करतोस. सोशल मीडियावर फेकतोस. रिअल लाईफमध्ये तर काहीही करताना दिसत नाहीस, असे एका युजरने त्याला सुनावले, तर अन्य एका युजरने, पण तुला देशाचा पंतप्रधान बनवणारच कोण? असा खोचक सवाल केला.


केआरकेने काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीवर असेच एक ट्विट केले होते. त्यानंतर तो युजर्सच्या निशाण्यावर आला होता. एका अलिशान बंगल्याचा फोटो पोस्ट करत, ज्यांना कोरोना व्हायरसमुळे भीती वाटतेय, त्यांनी माझ्या घरी यावे. माझे घर एकदम सुरक्षित आहे, असे ट्विट त्याने केले होते. यानंतर नेटक-यांनी त्याची चांगलीच मजा घेतली होती. हा दुबईचा बंगला आहे, इतकी फेकण्याची गरज नाही, असे लोकांनी त्याला सुनावले होते.

नेत्यांना केले होते लक्ष्य
अगदी अलीकडे केआरकेने भारतातील राजकीय नेत्यांना लक्ष्य केले होते. होय, देशातील प्रत्येक नेत्याने मदतनिधीत प्रत्येकी दहा कोटी रुपए द्यावेत. कारण शेवटी या नेत्यांकडे आज जे काही आहे, ते सगळे पब्लिकचेच तर आहे, असे केआरकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. यानंतरही तो ट्रोल झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: krk kamal r khan slams news channel anchors if he will be prime minister will put them jail-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.