kriti sanon asked justice cbi for sushant singh rajput shared instagram | सुशांतसाठी क्रिती सनॉनने मागितला न्याय, म्हणाली- सत्य जगासमोर यायलाच हवं

सुशांतसाठी क्रिती सनॉनने मागितला न्याय, म्हणाली- सत्य जगासमोर यायलाच हवं

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी जोर धरते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी त्याचे निकटवर्तीय आणि चाहते सीबीआयकडे मागणी करीत आहेत. या प्रकरणात सुशांतच्या कुटूंबापासून ते चाहत्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. त्यामुळे आता हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी होत आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाला आत्महत्या म्हणतेय. दरम्यान,  क्रिती सनॉनेही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. क्रितीने सत्य जगासमोर आणण्याचे आवाहन केले आहे, त्याचबरोबर सुशांतच्या कुटूंबाला न्याय मिळायला हवा, असेही म्हटले आहे.

क्रितीने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली ज्यामध्ये तिने लिहिले आहे - मी प्रार्थना करते की सत्य लवकरच बाहेर येईल. त्याचे कुटुंब, मित्र, चाहते आणि सर्वांसमोर सत्य यायला हवं. मी अशी आशा करतो आणि प्रार्थना करते की सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल,  जेणेकरून तपास कोणत्याही राजकीय अजेंडा आड येणार नाही आणि कुटुंबीयांना न्याय मिळेल. हि ती वेळ आहे जेव्हा सुशांतच्या आत्माला शांती मिळेल.  #cbiForssR #SushantSinghRaiput


क्रितीच्या आधी अंकिता लोखंडेनेही अशी मागणी करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत #CBIforSSR ची मागणी केली आहे. या व्हिडिओत अंकिता म्हणतेय की, सुशांतसोबत नेमकं काय झालं हे देशाला समजायलाच हवं. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी अंकिता त्याच्या कुटुंबासह उभी राहिली आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kriti sanon asked justice cbi for sushant singh rajput shared instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.