Krishna shroff shares photo with boyfriend brother tiger shroff reacted this way | Shocking : कृष्णा श्रॉफने बॉयफ्रेंड एबनसोबतचा शेअर केला फोटो, टायगर श्रॉफने केली उलटी

Shocking : कृष्णा श्रॉफने बॉयफ्रेंड एबनसोबतचा शेअर केला फोटो, टायगर श्रॉफने केली उलटी

कृष्णा श्रॉफ बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी तिचे सोशल मीडियावर फॉलोव्हर्सची संख्या खूप आहे. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. कृष्णा श्रॉफने बॉयफ्रेंड एबन होम्ससोबतचे  नेहमी ती एबनसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर करत होती. पुन्हा एकदा कृष्णा बॉयफ्रेंड एबन होम्ससोबत शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. टायगर श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा यांच्यामधील बॉन्डिगची झलक सोशल मीडियावर नेहमीच दिसते. दोघे एकमेकांच्या फोटोवर नेहमीच कमेंट्स करत असतात.  कृष्णाने बॉयफ्रेंड एबन होम्ससोबत शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. कृष्णाने शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. असे दिसते की टायगरला हा फोटो फारसा आवडलेला नाही कारण त्याने उलटी करणारे इमोजी कमेंटमध्ये केले आहे. तर दुसरीकडे एबनने हार्टवाले इमोजी कमेंटमध्ये टाकले आहेत. 


कृष्णा आणि  एबनसोबत असलेल्या नात्याबद्दल बोलण्यात अजिबात संकोच करत नाहीत. लॉकडाऊनपासून हे दोघे एकत्र राहत आहेत.  कृष्णा भावाप्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. इन्स्टाग्रामवर कृष्णा सुद्धा फिटनेसबाबतचे व्हिडिओ पोस्ट करत असते. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Krishna shroff shares photo with boyfriend brother tiger shroff reacted this way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.