ठळक मुद्देकृष्णा अभिषेकच्या पत्नीचे नाव कश्मीरा शाह असून तिने यस बॉस, प्यार तो होना ही था, वेकअप सिड, कही प्यार न हो जाये यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

कृष्णा अभिषेकने कॉमेडी नाईट्स बचाओ, कॉमेडी सर्कस या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच त्याने बोल बच्चन, इट्स एन्टरटेनमेंट यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला आहे. कृष्णा हा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाचा भाचा असून त्याचे खरे नाव हे अभिषेक शर्मा आहे. तो गोविंदाचा भाचा असला तरी त्याने स्वतःच्या मेहनतीने आज बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावर त्याची खास जागा निर्माण केली आहे. 

सध्या तो द कपिल शर्मा शो मध्ये झळकत असून त्याचा कॉमिक अंदाज त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे. तुम्हाला माहीत आहे का, कृष्णाची पत्नीदेखील अभिनेत्री असून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नव्हे तर तिने एका प्रसिद्ध मराठी चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती.

कृष्णा अभिषेकच्या पत्नीचे नाव कश्मीरा शाह असून तिने यस बॉस, प्यार तो होना ही था, वेकअप सिड, कही प्यार न हो जाये यांसारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ती बिग बॉसमध्ये देखील झळकली होती. कश्मीरा आणि कृष्णा यांनी 2013 मध्ये लग्न केले. काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून त्या दोघांची ओळख झाली होती. कश्मीराचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न एका उद्योगपतीसोबत झाले होते. लग्नाच्याआधी कृष्णा आणि कश्मीरा काही महिने लिव्ह इन मध्ये राहात होते.

कृष्णा आणि त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह हे सरोगसीच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी आई-वडील बनले. कश्मीरा आणि अभिषेक यांना जुळी मुले असून अभिषेक आणि कश्मीराच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्यांचे फोटो पाहायला मिळतात. 

Web Title: Krishna Abhishek is married to actress kashmira shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.