kolhapur hotels has gives special offer to people who show taanaji: the unsung warrior movie ticket | Tanhaji Movie : 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'चे तिकीट दाखवा आणि हॉटेलच्या बिलावर सूट मिळवा

Tanhaji Movie : 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर'चे तिकीट दाखवा आणि हॉटेलच्या बिलावर सूट मिळवा

ठळक मुद्देलोकांनी मोठ्या प्रमाणावर चित्रपटगृहात जाऊन तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहावी हे यामागचे कारण असल्याचे हॉटेल चालकांनी मीडियाशी बोलताना सांगितले. 

अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्‍टारर 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्‍टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यात तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला बरेच मागे टाकले आहे. या चित्रपटाने 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री मारली असून या चित्रपटाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.

'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' या सिनेमाला मुंबईतच नव्हे तर कोल्हापूरमध्ये देखील खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहाणाऱ्या लोकांसाठी खास ऑफर कोल्हापूरमधील काही हॉटेलने दिली आहे. कोल्हापूरातील मिसळ, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हे लोकांचे जीव ही प्राण आहेत. 'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचे तिकीट दाखवणाऱ्यांना काही हॉटेलमध्ये मिसळ, तांबडा रस्सा, पांढरा रस्स्यावर सुट मिळणार आहे. 

लोकांनी मोठ्या प्रमाणावर चित्रपटगृहात जाऊन तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहावी हे यामागचे कारण असल्याचे हॉटेल चालकांनी मीडियाशी बोलताना सांगितले. 

दमदार अ‍ॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू रसिकांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा चित्रपट एकूण 4540 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता.

'तान्‍हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचे बजेट ११० कोटी आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन आणि प्रिंट्सवर १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत चित्रपटाचा एकूण बजेट १२५ कोटींचा आहे. अशाप्रकारे चित्रपट हिट होण्यासाठी कमीत कमी १५० कोटी रुपये कमवावे लागतील.
 

Web Title: kolhapur hotels has gives special offer to people who show taanaji: the unsung warrior movie ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.