Know the how Much Time Taken for Ranu Mandal's Make up | रानू मंडलच्या या मेकअपला लागला होता इतका वेळ, वाचा सविस्तर

रानू मंडलच्या या मेकअपला लागला होता इतका वेळ, वाचा सविस्तर

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलेल्या रानू मंडलला हिमेश रेशमियाने पार्श्वगायनात पहिला ब्रेक दिला. यानंतर रानू  एका रात्रीत स्टार बनली. कधी भीक मागताना गाणं गाणारी व्यक्ती थेट बॉलीवूडमध्ये पोहोचू शकेल हा विचार रानूने स्वप्नातही विचार केला नसेल. 'एक प्यार का नगमा हे' गाणं गात रानू मंडल स्टार बनली होती.

गेल्या काही दिवसांपासून रानू मंडल सध्या खूप चर्चेत आहे. आधी चाहत्यांबरोबर उद्धटपणे वागण्यामुळे तिच्यावर नेटीझन्सने खूप टीका केली होती. या गोष्टीला अवघे काही दिवसच उलटत नाहीत. तोपर्यंत पुन्हा ती चर्चेत आली. चर्चेत कारणीभूत ठरला रानू मंडलचा हा भयानक मेकअप लूक फोटो. कानपूरमध्ये एका सलूनच्या उदघाटनसाठी रानूला आमंत्रण देण्यात आले होते. सध्या या मेकअप आर्टीस्टने तिच्या मेकअप स्कील्सचा वापर करत रानूचा  मेकओव्हर केला. 


रानूचा मेअकप इतका हेवी झाला की यांत रानूला पाहाताच धडकी भरेन इतका भयंकर केला होता. यावेळी तिने मेकअप आर्टीस्टबरोबर रॅम्प वॉकही केला. रानूने पीच कलरचा लेहंगा परिधान केला होता. रॅम्पवॉक करतेवेळी फॅशन सिनेमातील 'ये है जलवा हे' गाणे बॅकग्राऊंडमध्ये वाजत आहे. 
रानूचा मेकअप पाहून मेकअप आर्टीस्टवर जोरदार टीका होत आहेत.

 

 

तर दुसरीकडे रानूवर विनोदी मिम्सही तुफान व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या गोष्टींसह तुलना करत रानूची खिल्ली उडवली जात आहे. विनोदी मिम्स सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. विशेष म्हणजे रानूचा हा मेकअप करण्यात मेकअप आर्टीस्टला केवळ दहा मि.लागले असल्याचे  बोलले जात आहे.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Know the how Much Time Taken for Ranu Mandal's Make up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.