ठळक मुद्दे कारशिवाय प्रियांकाला बाइकचही वेड आहे. 2015 मध्ये प्रियंकाने गुलाबी रंगाची हार्ले डेविडसन बाइक विकत घेतली होती.

बॉलिवूडच्या देसी गर्ल आज ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी प्रियंकाने बराच संघर्ष केला.  2000 मध्ये तिने मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली आणि प्रियंका बॉलिवूडमध्ये आली. आज बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.  हॉलिवूडमध्येही तिचा दबदबा आहे. गतवर्षी प्रियंकाने अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. सध्या प्रियंका पर्सनल लाईफसोबत प्रोफेशनल लाईफ एन्जॉय करत आहे. पण आज आम्ही प्रियंकाच्या संपत्तीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


होय, या देसी गर्लची एकूण संपत्ती 1 अब्ज 92 कोटींच्या घरात आहे. प्रियंकाचे मुंबईत अनेक घरं आहेत. वसोर्वात एका बिल्डिंगमध्ये प्रियंकाचे तीन मोठी घरं आहेत. तसेच न्यूयॉर्कमध्ये पेन्ट हाउस आहे. या पेन्ट हाउसची किंमत 30 कोटी रुपये आहे. याशिवाय मुंबई आणि गोव्यात तिच्या नावाने जमीन आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बागा बीचवरही तिचा एक बंगला आहे, ज्याची किंमत 20 कोटी रुपये आहे.


 

2014 मध्ये प्रियंकाला यारी रोडवर एक बंगला विकत घ्यायचा होता. या बंगल्याचे नाव दरिया महल असे आहे.  या बंगल्यासाठी 100 कोटी रुपये द्यायलाही ती तयार होती. मात्र काही कारणांमुळे ही डील होऊ शकली नाही. नुकतेच प्रियंका आणि निकने Beverley Hillsवर एक घर विकत घेतले. या घराची किंमत 44 कोटी रुपये आहे.

Bumble या डेटींग अ‍ॅपमध्येही प्रियंकाची गुंतवणूक आहे. याशिवाय तिची स्वत:ची पर्पल पेबल ही प्रॉडक्शन कंपनीही आहे. फार कमी अभिनेत्रींकडे Rolls Royce Ghost ही कार असते. प्रियंकाकडे ही कार आहे. या कराची किंमत जवळपास 5 कोटी रुपये आहे. 


तिच्याकडे BMW 5 series, BMW 7 series, Audi Q7, Porsche Cayenne आणि दोन मर्सिडीज कार आहेत.  कारशिवाय प्रियांकाला बाइकचही वेड आहे. 2015 मध्ये प्रियंकाने गुलाबी रंगाची हार्ले डेविडसन बाइक विकत घेतली होती. व्हॅलेंटाइन डेला तिने ही बाइक स्वत:लाच गिफ्ट केली होती. प्रियंकाला महागड्या बॅग विकत घ्यायलाही आवडतात. तिच्याकडे  Bottega Veneta, Tod's आणि Fendi या ब्रँडचे 4 लाख रुपयांच्या बॅग आहेत.

Web Title: know about priyanka chopra property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.