बॉलिवूड व क्रिकेट यांचं खास कनेक्शन आहे. बऱ्याचदा या दोन्ही क्षेत्रातील व्यक्तींचे नाव एकमेकांशी जोडलं जातं. त्यात आता क्रिकेटर केएल राहुलच्याही नावाची चर्चा सुरू आहे. करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमधून वादात आलेला केएल राहुल गेल्या काही दिवसांपासून अफेयरच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. याबाबतचा खुलासा नुकताच त्याने केला आहे.


मीडियामध्ये अशी चर्चा सुरू आहे की, केएल राहुल आलियाची बेस्ट फ्रेंड आकांक्षा रंजनला डेट करतो आहे. आकांक्षाने खुलासा केला होता की, केएल राहुलला पहिल्यांदा रणबीर कपूरला भेटवलं होतं. आकांक्षाच्या या खुलाशानंतप राहुलचं नाव तिच्यासोबत जोडलं गेलं आणि चर्चा सुरू झाली.


आता बॉम्बे टाईम्सशी बोलताना केएल राहुलनं सांगितलं की, ओह, या सगळ्या गोष्टींबद्दल लिहिलं गेलंय? वास्तविकतेत मी न्यूजपेपर वाचत नाबी, त्यामुळे माझ्याबद्दल काय लिहिलंय माहित नाही. माझ्या खासगी जीवनाला खासगी कसं ठेवायचं हे शिकलो आहे आणि याबद्दल मला बोलायचं नाही. आता मी क्रिकेटसाठी बांधील आहे.


जेव्हा केएल राहुलला तो सिंगल आहे का, असे विचारले. या प्रश्नावर त्याने सांगितले की, मला माहित नाही.जेव्हा मला माहित पडेल तेव्हा तुम्हाला मी फोन करून सांगेन. 


केएल राहुलचं नाव मुन्ना माइकल चित्रपटातील अभिनेत्री निधी अग्रवाल सोबतही जोडलं गेलं होतं. हे वृत्त अफवा असून आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचं निधीनं सांगितलं होतं.


याशिवाय केएल राहुलचं नाव सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबतही जोडलं गेलं होतं. आकांक्षी रंजनने एक फोटो शेअर केला होता. ज्यात केएल राहुल, अथिया शेट्टी व आकांक्षा दिसत आहेत. त्यानंतर असं बोललं जातं होतं की, केएल राहुल व अथिया शेट्टी मागील वर्षी फेब्रुवारीत एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी त्या दोघांना याबाबत विचारलं त्यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


Web Title: Kl Rahul Dating Alia Bhatt Best Friend Akansha Ranjan Now Cricketer Break Silence
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.