बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. मात्र एकवेळ असा होता जेव्हा सैफ अमृता सिंगच्या प्रेमात लट्टू झाला होता.


एकेकाळी फिल्मी जगात लोकप्रिय राहिलेली अमृता सिंगच्या प्रेमात सैफ अली खान वेडापीसा झाला होता. त्याने त्याच्या पहिल्या भेटीचा किस्सा एका चॅट शोमध्ये शेअर केला होता. त्यावेळी सैफ अली खान सिनेइंडस्ट्रीत स्ट्रगल करत होता आणि अमृताने आपले स्थान निर्माण केले होते. तेव्हा एक दिवस असा होता जेव्हा सैफने अमृताकडे घरी जाण्यासाठी १०० रुपये मागितले होते आणि त्या बदल्यात अमृताने त्याला तिची कार घेऊन जायला सांगितले होते.


त्यावेळी अमृता सिंग खूप बिनधास्त आणि बेधडक स्वभावाची होती. त्यावेळी ती सिनेइंडस्ट्रीत स्टार बनलेली होती आणि सैफ त्यावेळी स्ट्रगल करत होता. १९९९ साली सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये दोघांनी त्यांच्या प्रेमाचे किस्से सांगितले होते. सैफ या मुलाखतीत आणि प्रेमाचा किस्सा ऐकवताना खूप ब्लश करत होते.


सैफ अली खान आणि अमृता सिंगची पहिली भेट राहुल रवैलच्या चित्रपटादरम्यान झाली होती, या चित्रपटातून सैफ अली खान पदार्पण करत होता. राहुल आणि अमृताची चांगली मैत्री होती त्यामुळे त्याने चित्रपटाच्या स्टारकास्ट सैफच्या फोटोशूटसाठी अमृताला निमंत्रित केले होते. यावेळी सैफ सेटवर येणाऱ्या पाहुण्यांसोबत होस्टसारखा व्यवहार करत होता. फोटोशूट दरम्यान सैफने अमृताच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि तेव्हा अमृताने त्याला चांगल्या रितीने नोटीस केले होते. अमृताला वाटू लागले होते की, सैफने अशारितीने हात ठेवून हिंमत दाखवली आहे. हे पहिल्या नजरेतील प्रेम नव्हते, पण काहीतरी होते की दोघे एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले होते.


हे फोटोशूट लगेच संपले पण सैफचे हृदय अमृता सिंगसाठी धडकू लागले होते. फोटोशूटनंतर अखेर सैफला रहावले नाही आणि त्याने अमृता सिंगचा फोन नंबर डायल केला. त्याने फोनवर अमृताला डिनरसाठी इन्वाइट केले. सैफने विचारले होते की माझ्यासोबत डिनरला यायला आवडेल का? त्यावर अमृताचे उत्तर चकीत करणारा होता. तिने म्हटले की, नाही, मी डिनरसाठी बाहेर जात नाही पण तुमची इच्छा असेल तर डिनरसाठी माझ्या घरी येऊ शकतो आणि सैफ त्या रात्री अमृताच्या घरी गेला.


सैफ अली खानने मुलाखतीत सांगितले होते की, मी कोणतीही अपेक्षा ठेवून गेलो नव्हतो. फक्त तिच्यासोबत चांगला वेळ व्यतित करायचा होता आणि तिला आणखी जाणून घ्यायचे होते. मी तिथे जेव्हा गेलो तेव्हा विना मेकअपमध्ये असलेल्या अमृताला पाहून हैराण झालो होतो. ती आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसत होती. सैफचे मन नक्कीच तुटले असेल कारण त्याच्या येण्याआधी अमृताने चांगले आउटफिट नव्हते घातले आणि मेकअपही केला नव्हता. याचा अर्थ स्पष्ट आहे की तिला सैफमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता.


सैफच्या मनातले कदाचित अमृताने ओळखले होते आणि तिने सैफला स्पष्ट सांगितले होते की, जर तू विचार करून आला असशील की आपल्यामध्ये काही होऊ शकते तर तसे अजिबात नाही. त्यामुळे तू रिलॅक्स रहा. त्यावर सैफ हैराण झाला आणि त्याने तिला म्हटले की , तू आतून इतकी सॉफ्ट आणि बाहेरून इतकी रफटफ का आहेस..त्या दोघांमध्ये बऱ्याच गप्पागोष्टी झाल्या आणि त्यादरम्यान त्यांच्यात पहिली किस झाली होती. या लिपलॉकनंतर सैफने त्याच्या मनातील गोष्ट सांगितली होती आणि सांगितले की त्याचे तिच्यावर प्रेम आहे. अमृताने देखील उत्तरात तिचेही त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितले.

सैफ अली खान त्याच्याहून १२ वर्ष मोठ्या असणाऱ्या अमृता सिंगच्या प्रेमात पडला. दोघांनी १९९१ मध्ये लग्नही केलं. घरातल्यांचा विरोध पत्करून सैफने लग्न केलं होतं. १३ वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खानने २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते. या लग्नाला सारादेखील उपस्थित होती. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी साराची आई अमृता सिंगनेच तिला तयार केले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kiss by kiss! Saif Ali Khan - Don't miss Amrita Singh's KISS story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.