व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विनोद खन्ना कॅरेक्टमध्ये इतके मग्न व्हायचे की, जणू सगळे काही प्रत्यक्षातच घडत असल्याचे त्यांना वाटत असावे. याच कारणामुळे अनेक अभिनेत्री त्यांच्याबरोबर रोमँटीक सीन देण्यासाठी घाबरायच्या. विनोद खन्नाचे नाव ऐकताच अनेकजण नकारच द्यायच्या.दयावान सिनेमाच्या शूटिंगदरम्यान असाच काहीसा भयानक किस्सा माधुरी दिक्षितसोबतही घडला होता.


माधुरी दिक्षित आणि विनोद खन्ना यांचा दयावान सिनेमा रसिकांना चांगलाच माहिती आहे. सिनेमातील दोघांवर चित्रीत झालेले बोल्ड सीन्स आणि गाणे आजही रसिक विसरलेले नाहीत. याच सिनेमादरम्यान माधुरीला भयानक अनुभव आला होता. किसींग सीनचे शूट सुरू होते त्याचदरम्यान विनोद खन्ना यांनी माधुरी दिक्षितच्या ओठांचाच चावा घेतल्याचे बोलले जाते.


विशेष म्हणजे दिग्दर्शकाच्या सुचनेकडेही विनोद खन्ना यांचे लक्ष गेले नाही. कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना यांनी स्वतःला सावरले नव्हते. आणि याच कारणामुळे 'दयावाननंतर' माधुरीने कधीच विनोद खन्नासह सिनेमात काम केले नाही. 'दयावान'मधल्या माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यातल्या किसिंग सिनवर खूप टीका झाली होती.

मुळात माधुरी या सीनसाठी तयार होणार नाही असे सिनेमाच्या टीमलाही वाटत होते. मात्र शेवटी भूमिकेची गरज म्हणून माधुरीने आपल्यापेक्षा वयाने २० वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या विनोद यांच्याबरोबर हे सीन्स करण्यास होकार दिला होता. माधुरीच्या या होकाराने सगळ्यांनाच धक्का बसला होता.

प्रेक्षक फक्त दोघांमधील हॉट सीन्स बघण्यासाठीच सिनेमागृहात हजेरी लावत असत. त्याचबरोबर माधुरीच्या धाडसाचेही कौतुक करीत असत. परंतु माधुरी मात्र या सीन्समुळे स्वत:ला खूपच अनकम्फर्ट समजायली लागली. या चित्रपटाच्या रिलीजच्या तीन-चार वर्षांनंतर माधुरीने एका मुलाखतीत मान्य केले होते की, ‘दयावान’मध्ये तिने दिलेले इंटीमेट सीन्स खूपच निराशाजनक होते. मला आजही पश्चाताप होत आहे की, मी या भूमिकेसाठी नकार देऊ शकले नाही. मला हा चित्रपट करायला नको होता, असे तिने म्हटले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kiss Day Special When Vinod Khanna bite Madhuri Dixit Lips and kissed forcefully while Romantic Scene Shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.