कॅन्सरशी झुंज देत असलेल्या किरण खेर रूग्णालयात भरती, 3 तास चालली बोन सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 06:12 PM2021-05-27T18:12:17+5:302021-05-27T18:37:04+5:30

Kirron Kher Health Update : जाणून घ्या कशी आहे किरण खेर यांची प्रकृती

kirron kher admitted to hospital for bone surgery in kokilaben hospital mumbai suffering from blood cancer | कॅन्सरशी झुंज देत असलेल्या किरण खेर रूग्णालयात भरती, 3 तास चालली बोन सर्जरी

कॅन्सरशी झुंज देत असलेल्या किरण खेर रूग्णालयात भरती, 3 तास चालली बोन सर्जरी

Next
ठळक मुद्देगेल्या आठवड्यातच अनुपम खेर यांनी किरण यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. 

ज्येष्ठ अभिनेत्री व चंढीगड येथील भाजपाच्या खासदार किरण खेर (Kirron Kher) सध्या कॅन्सरशी झुंज देत आहेत. गुरूवारी त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात भरती करण्यात आले. यावेळी त्यांची बोन सर्जरी करण्यात आली. सकाळी 7.30 वाजता सुरू झालेली ही शस्त्रक्रिया 3 तास चालली. (Kirron Kher Health Update)
वृत्तानुसार, या शस्त्रक्रियेदरम्यान किरण यांच्या बोनमॅरोतून   कॅन्सरच्या पेशी  काढण्याचा प्रयत्न केला गेला. सर्जरीदरम्यान किरण खेर यांचे पती व अभिनेते अनुपम खेर पूर्णवेळ रूग्णालयात होते. (Actress Kirron Kher suffering from Blood Cancer) ‘अमर उजाला’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. दरम्यान अनुपम खेर यांच्यावतीने अद्याप याबद्दल कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

68 वर्षांच्या किरण गेल्या 5 महिन्यांपासून मल्टीपल मायलोमा या आजाराशी झुंज देत आहेत. हा एकप्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. गेल्या 1 एप्रिलला किरण यांना कॅन्सर असल्याची बातमी पहिल्यांदा मीडियासमोर आली होती. पण त्याचे निदान गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येच झाले होते.
गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गेल्या 4 डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते.

अलीकडे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांवरून कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते.
गेल्या आठवड्यातच अनुपम खेर यांनी किरण यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. कधी कधी किरण खूप पॉझिटीव्ह असते. पण किमोथेरपीनंतर तिच्यात अनेकदा नैराश्य दाटून येते. आम्ही आमच्यापरीने पूर्ण काळजी घेत आहोत. ती सुद्धा आजाराला खंबीरपणे सामोरी जातेय. डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत आहेत, असे अनुपम म्हणाले होते.

किरण खेर यांनी 1985 साली अभिनेते अनुपम खेर   यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती. ते दोघे एकाच थिएटरमध्ये काम करत होते. कामादरम्यान ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kirron kher admitted to hospital for bone surgery in kokilaben hospital mumbai suffering from blood cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app