अभिनेत्री कियारा अडवाणीने फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. खरे तर ‘फग्ली’ या पहिल्याच चित्रपटाने करिअरच्या सुरुवातीला कियाराला मोठा धक्का दिला. पहिलाच डेब्यू सिनेमा फ्लॉप झाला. पण कियाराने हार मानली नाही. पुढे ‘एम एस धोनी: द अन्टोल्ड स्टोरी ’ हा सिनेमा मिळाला आणि कियारा पहिल्यांदा सर्वांच्या नजरेत भरली. तिचा गोड चेहरा, तितकेच गोड हास्य प्रेक्षकांना भावले. यानंतर ‘लस्ट स्टोरीज्’ही वेबसीरिज आली आणि कियारा ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. 


नुकत्याच रिलीज झालेल्या ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील कियाराची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. सध्याच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये कियाराचे नाव सगळ्यात वरती दिसते आहे. सध्या कियारा तिचा आगामी सिनेमा गुडन्युजला घेऊन चर्चेत आहे.

गुडन्युजच्या प्रमोशन दरम्यान कियारा स्टायलिश अंदाजात दिसली. ग्रीन रंगाचा शिमरी ड्रेस तिने परिधान केला होता. या ड्रेसला डीप गळा आणि त्यावर चमचमते जॅकेट घातले होते.


इंडिया टूडेच्या रिपोर्टनुसार कियाराच्या जॅकेटची किंमत 14, 164 आहे तर पँटची किंमत 17,750 इतकी आहे. या ड्रेसवर कियाराने कोणतीच एक्सेसरीज घातली नव्हती. त्यामुळे तुम्हाला जर कियारासारखा लूक हवा असेल तर त्यासाठी जवळपास 31 हजार मोजावे लागतील.    

Web Title: kiara advani wears mini dress as a top with pants for event it costs rs 30k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.