कियारा अडवाणीने फगली या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर मशिन या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. पण लस्ट स्टोरी या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. त्यानंतर कबीर सिंग चित्रपटातील तिच्या भूमिकेतून ती लोकप्रिय झाली. नुकतेच कियाराने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी तिचा सुपरहिट ठरलेला चित्रपट कबीर सिंगमधील बेखयाली गाणं आपल्या सुरेल आवाजात गाऊन उपस्थितांना चकीत केलं.


कियाराने यापूर्वी कधी गाणं गायलं नव्हतं. तिचा हा पहिलाच अनुभव होता. ती म्हणाली की, मी एक बाथरूम सिंगर आहे आणि मी पहिल्यांदाच गाणं सगळ्यांसमोर सादर केलं. 


कियाराचे बेखयाली गाणं गाऊन सर्वांना चकीत केलं. ती म्हणाली की, हे अचानक झालं. मी या अवॉर्ड शोमध्ये कबीर सिंगमधील गाण्यावर परफॉर्म करणार होती. त्याला मी जास्त व्यक्तिगत करण्यासाठी विचार केला की यातील गाणं गाऊयात. आयोजकांनी मला विचारलं की, तू गाणं गाण्याच्या निर्णयावर ठाम आहेस आणि मी म्हणाले की शॉट देते.


हे सर्व इतक्या झटपट झाले की आयोजकांना ही संधी गमवायची नव्हती. रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये लगेच व्यवस्था केली.कियारा स्वतः हैराण झाली. कियारा म्हणाली की, हे सगळं १५ मिनिटांत ठरलं. नशीब सगळं नीट झालं आणि सगळं नीट जुळून आलं आणि आम्ही या चंकचा वापर अॅक्टच्या शेवटी केला.


कियारा आता गुड न्यूज चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात कियारा व्यतिरिक्त करीना कपूर, अक्षय कुमार व दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय कियारा लक्ष्मी बॉम्ब, इंदु की जवानी, भूल भुलैया २ व शेरशाहमध्ये झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kiara Advani surprises audiences with a song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.