हल्ली सगळेच जण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना दिसतात. अभिनेत्री कियारा आडवाणीनेदेखील असेच काही केले. पण ते वेगळ्या अंदाजात. कियाराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती रॅप करताना दिसते आहे आणि सोबतचा या व्हिडिओत ती तिचे मोठे केस कापताना दिसते आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही अशी का करतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. 

आईएएनएसच्या वृत्तानुसार कियारा म्हणाली की, मला माझे केस खूप आवडतात. कोणाला आवडत नाहीत. पण शूटिंग करताना वेगवेगळ्या लूकसाठी केसांवर अनेक रासायनिक उत्पादकांचा वापर केला जातो आणि माझ्याकडे केसांची देखभाल करण्यासाठी वेळ नाही आहे. जरी माझी विचारसरणी आधुनिक असली तरी काही बाबतीत मी परंपरेचे पालन करते. खासकरुन सुंदर दिसण्यासाठी.

मोठ्या केसांची काळजी मी घेऊ शकत नाही. त्यामुळे मी माझे केस कापले आहेत. आता मला हा नवीन लूक किती चांगला वाटतो, हे पाहूयात, असे कियारा पुढे म्हणाली.

प्रोफेशन लाईफबद्दल सांगायचे तर कियारा लवकरच शाहिद कपूरसोबत कबीर सिंग चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा दारूच्या नशेत बुडालेल्या सर्जनची आहे. जो प्रेमात अपयशी ठरल्यानंतर स्वतःला बर्बाद करायचे ठरवतो.

हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे. या चित्रपटाशिवाय कियारा गुड न्यूज चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात तिच्यासोबत करीना कपूर, अक्षय कुमार व दलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहेत. तसेच तिची कंचना या चित्रपटात देखील वर्णी लागली आहे.

Web Title: Kiara Advani Sings 'Dil Kehta Hai Just Cut It' As She Cuts Hair Short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.