ठळक मुद्देकियाराने या मुलाखतीत सांगितले आहे की, मी अभिनयक्षेत्रात येण्याआधी माझ्या आईच्या प्री-स्कूलमध्ये काम करत होती. तिथे सकाळी सात वाजता मी पोहोचायचे आणि तिथे लहान मुलं सांभाळायचे.

कियारा अडवाणीने फग्ली या चित्रपटापासून तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर मशिन या चित्रपटात ती झळकली. या दोन्ही चित्रपटामुळे तिला म्हणावी तशी लोकप्रियता मिळाली नाही. पण लस्ट स्टोरी या चित्रपटामुळे प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता एम एस धोनीः द अन्टोल्ड स्टोरी या चित्रपटामुळे मिळाली. कलंक या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात देखील कियारा एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.

कियारा आता लवकरच गुड न्यूज या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात दलजीत दोसांजसोबत तिची जोडी जमली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, करिना कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन या चित्रपटाची टीम करत असून ते या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तिने नुकतीच एक मुलाखत दिली. 

या मुलाखतीत तिने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी काय करत होती याविषयी सांगितले आहे. तिने या मुलाखतीत सांगितले आहे की, मी अभिनयक्षेत्रात येण्याआधी माझ्या आईच्या प्री-स्कूलमध्ये काम करत होती. तिथे सकाळी सात वाजता मी पोहोचायचे आणि तिथे लहान मुलं सांभाळायचे. मी लहान मुलांसाठी कविता गायचे. त्यांना अक्षरं शिकवायचे. मला लहान मुले खूप आवडतात. मी त्यांचे डायपर बदलायचे काम देखील केले आहे.

Web Title: Kiara Advani Reveals That She Used Work At A Pre-School Before She Became An Actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.