बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी चित्रपटावर सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. टायगर श्रॉफसोबत हृतिक रोशनचा वॉर हा ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाला होता. त्यानंतर त्याच्या आगामी चित्रपटाची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र हृतिक रोशनने अद्याप आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही. तो सध्या क्रिश ४वर काम करतो आहे आणि या चित्रपटाची जोरदार तयारी सुरू आहे. आता असे वृत्त समोर आले आहे की अभिनेता हृतिक रोशनचा आगामी चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड झाली आहे.


समोर आलेल्या वृत्तानुसार क्रिश ४च्या निर्माते व दिग्दर्शकांनी कियारा आडवाणीचे नाव फायनल केले आहे. यापूर्वी क्रिती सनॉनच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र आता निर्माते कियाराचे नाव फायनल करणार आहेत.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, सूत्रांनी सांगितले की, कियारा आडवाणीला क्रिश ४मध्ये घेण्यासाठी बातचीत सुरू आहे. या चित्रपटासाठीदोन अभिनेत्री हवे होते. पहिल्यांदा क्रिती सनॉनचेच नाव फायनल केले होते. पण तिच्या हातात पाच चित्रपट आहे. जे तिने साइन केले आहेत. तिच्याकडे तारखा उपलब्ध नव्हत्या. त्यानंतर कियारा आडवाणीच्या नावावर विचार केला जात होता.

ती खूप प्रेमळ आणि छान अभिनेत्री आहे आणि हृतिक रोशनची जोडी ऑन स्क्रीन एकदम फ्रेश वाटेल. आता रोशन कुटुंब कियारासोबत चर्चा करत आहे आणि लवकरच सर्व फॉर्मेलिटीदेखील पूर्ण केली जाईल.


कबीर सिंग आणि लक्ष्मी चित्रपटानंतर कियारा आडवाणीकडे खूप चांगले चित्रपट आहेत. लवकरच ती इंदु की जवानीमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती शेरशाह आणि भूलभुलैया २मध्येदेखील दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kiara Advani or Kriti Sanon ?, 'Krish 4' starring Hrithik Roshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.