स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असतो आणि दुसरे म्हणजे हौसेला मोल नसतं हे कियारा अडवानीसाठी सार्थ ठरतं. कारण कियारा आडवाणी आता तिच्या कोणत्या अपकमिंग प्रोजेक्टमुळे नाही तर या छोट्याशा बॅगमुळे चर्चेत आली आहे. होय, आता ही बॅग आणि कियाराचा काय संबंध असे वाटणे साहजिक आहे. पण फोटोत दिसणारी बॅग साधी नसून खूप खास आहे. बॅगला बघून तुम्ही तिची साधारण किंमतीचा अंदाजा लावला असेलही पण, या बॅगची किंमत काही हजोर नव्हेतर चक्क 5000 डॉलर म्हणजेच 3 लाख 50 हजार इतकी आहे. किंमत वाचून तुम्ही नक्कीच थोडे थबकले असालच. त्यामुळे या बॅगमुळे सध्या कियाराच्याच बॅग चर्चेचा विषय ठरली. तसेच कियारा आपल्या हटके ड्रेसिंग आणि फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.


बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे तिच्या सिनेमांप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळेही ती चर्चेत असते.  'लस्ट स्टोरीज' वेब सीरिजमधून ती प्रसिद्धी झोतात आली.  'लस्ट स्टोरीज'मधील तिच्या वायब्रेटर सीनमुळे तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे कियाराने 'फगली' या चित्रपटाव्दारे या क्षेत्रात पदार्पण केले आहे. 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. सध्याच्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये कियाराचे नाव सगळ्यात वरती दिसते आहे.

2009मध्ये आलेल्या आमीर खानचा '3 इडियट्स' चित्रपट पाहून कियाराला तिच्या वडिलांनी अभिनय करायला परवानगी दिली होती. 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट सोडला तर कियाराच्या चित्रपटाना बॉक्स ऑफिसवर फारसे यश मिळालेले नाही आहे. नुकताच आलेला तिचा मशीन हा चित्रपट फ्लॉप झाला होता. सध्या कियारा एक सुपरहिट चित्रपटाच्या शोधात आहे. 


Web Title: Kiara Advani opted for an INSANELY pricey Chanel bag on her birthday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.