Khushi Kapoor reveals father Boney has a curfew time for her | बोनी कपूर आहेत ओव्हर प्रोटेक्टिव्ह! खूशी म्हणते, कधी कधी वाटतं ‘कर्फ्यू’ लागलाय!
बोनी कपूर आहेत ओव्हर प्रोटेक्टिव्ह! खूशी म्हणते, कधी कधी वाटतं ‘कर्फ्यू’ लागलाय!

ठळक मुद्देबॉलिवूड एन्ट्रीबद्दलही खुशी बोलली. मी बॉलिवूडमध्ये येणार आणि यासाठी मी करण जोहरला डोळे बंद करून फॉलो करणार. पण माझ्या को-स्टारची निवड मात्र माझे पापा करतील, असे खुशी म्हणाली.

श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूरखुशी कपूरबद्दल जरा अधिक प्रोटेक्टिव्ह झाले आहेत. हे आमचे नाही तर खुद्द जान्हवी व खुशीचे मत आहे. होय, अलीकडे जान्हवी व खुशीने नेहा धूपियाच्या ‘BFF's विद वॉग’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली. यावेळी दोघी बहीणींनी आपल्या पर्सनल लाईफशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. पापा बोनी कपूर किती ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत, हे खुशीने यावेळी सांगितले.

पापा माझ्या आणि जान्हवीबद्दल ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत. कधी कधी ते इतकी कडकी बंधने लादतात की, जणू कर्फ्यू लागलाय, असे मला वाटते, असे खुशीने यावेळी सांगितले. तू १८ वर्षांची आहेत. तू कधी कुठल्या अडचणीत सापडली आहेस? असा प्रश्न नेहाने खुशीला केला. यावेळीही खुशीने कर्फ्यूचा उल्लेख केला. ‘कर्फ्यू! मी कुठे जातेय, काय करतेय, कुणासोबत आहे, यावर पापांचे बारीक लक्ष असते. एकदा तर पापाने माझ्या एका मित्राला , तुझा आणि खुशीचा फोटो पाठव,’असा मॅसेज केला होता, असे खुशी म्हणाली.

तुझ्या डेटींगबद्दल घरच्यांना ठाऊक आहे की तू त्यांना अद्याप काही सांगितलेच नाही? असे नेहाने खुशीला विचारले. यावर मी एका चांगल्या व्यक्तीसोबत असेल तर माझ्या पापांचा यावर काहीही आक्षेप नसेल, असे उत्तर खुशीने दिले. बॉलिवूड एन्ट्रीबद्दलही खुशी बोलली. मी बॉलिवूडमध्ये येणार आणि यासाठी मी करण जोहरला डोळे बंद करून फॉलो करणार. पण माझ्या को-स्टारची निवड मात्र माझे पापा करतील, असे खुशी म्हणाली. खुशीला टॅटू खूप आवडतात, याचाही खुलासा या चॅट शोमध्ये झाला. खुशीच्या शरीरावर तीन टॅटू आहेत. एकेकाळी तिची आई श्रीदेवी तिच्या या टॅटू प्रेमामुळे चिंतीत होती.

Web Title: Khushi Kapoor reveals father Boney has a curfew time for her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.