khushi kapoor to join acting school in new york | जान्हवी कपूरनंतर खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, न्यूयॉर्कच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये घेतले अ‍ॅडमिशन

जान्हवी कपूरनंतर खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, न्यूयॉर्कच्या अ‍ॅक्टिंग स्कूलमध्ये घेतले अ‍ॅडमिशन

अलीकडेच बातमी आली होती की बोनी कपूर आणि श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. बोनी कपूर यांनी ही तिला परवानगी दिली आहे.खुशी आधीपासूनच सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे आणि ग्लॅमरच्या बाबतीत अनेकांना मात देते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि या फोटोंना तिचे फॅन्स नेहमीच प्रतिसाद देतात. तिला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून ती अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी बहीण जान्हवीसोबत दिसते. आता न्यूयॉर्कमधील स्टार्सबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये खुशीने एका सेमेस्टरच्या अ‍ॅक्टिंग कोर्समध्ये प्रवेश घेतल्याची माहिती मिळत असून यासाठी ती अमेरिकेत गेली आहे. 

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार खुशी अ‍ॅक्टिंग कोर्स संपल्यानंतरच हिंदी चित्रपटांत पदार्पण करणार आहे. 2020 साली खुशी बॉलिवूड चित्रपटातून लॉन्च होईल, अशी चर्चा होती. करण जोहरने आधीपासूनच बोनी कपूर यांना खुशीला लाँच करण्यासाठी ऑफर दिली आहे. करणच्या प्रॉडक्शन हाऊसने जान्हवी कपूरलाही 'धडक' या चित्रपटातून लॉन्च केले होते.

खुशी आणि तिच्या कुटुंबीयांना तिच्या डेब्यूची कोणतीच घाई नाही आहे. न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमी ही जगातील सगळ्यात प्रसिद्ध फिल्म ॲकेडमीमधील एक असून आजवर बॉलिवूडमधील अनेकांनी यात फिल्म मेकिंगचे, अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: khushi kapoor to join acting school in new york

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.