Keep in mind, the kidneys are two and the liver is one ...! Reply to Sunil Grover's Kapil Sharma! | ध्यान रखो, किडनी दोन और लीवर एक है...! सुनील ग्रोव्हरचे कपिल शर्माला असेही उत्तर!!

ध्यान रखो, किडनी दोन और लीवर एक है...! सुनील ग्रोव्हरचे कपिल शर्माला असेही उत्तर!!

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर या दोघांच्या भांडणाचा दुसरा अंक सध्या गाजतोय. होय, ‘ कपिलने मला त्याचा नवा शो ‘फॅमिली टाईम विद कपिल’ आॅफर केला नाही,’ या सुनील ग्रोव्हरच्या tweetने या नव्या वाकयुद्धाची सुरुवात झाली.  सध्या या वाकयुद्धाने सगळ्यांचे चांगलेच मनोरंजन  होताना दिसतेय.
कपिलचा  ‘फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’ हा नवा कोरा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. याच पार्श्वभूमीवर,तुला कपिलच्या नव्या शोसाठी विचारणा झालीयं का? असा प्रश्न एका चाहत्याने सुनीलला सोशल मीडियावर विचारला. यावर सुनीलने अगदी सविस्तर उत्तर दिले. ‘भाई, आप जैसे कुछ और लोग भी मुझसे सेम पुछते है. लेकीन मुझे इस शो के लिए कॉल नहीं आया. मेरा फोन नंबर भी सेम है. इंतजार कर के अब मैने कुछ और साईन कर लिया कल. आप लोगों की दुआ से एक अच्छे प्रोजेक्ट के साथ जुडा हूं. जल्दी आपके सामने आता हू...’, असे सुनीलने लिहिले.पण सुनीलचे हे tweet का कुणास ठाऊक पण कपिलला झोंबले आणि त्याने सुनीलला चांगलेच सुनावले. ‘मी तुला शंभरदा फोन केला. दोनदा तुझ्या घरी येऊन गेलो. प्लीज, नाही त्या अफवा पसरवू नकोस,’ असे त्याने सुनीलला उद्देशून लिहिले. ‘ यापुढे मी कुणालाही माझा फायदा घेऊ देणार नाही. इनफ इज इनफ़...’,असेही कपिल म्हणाला. 


ALSO READ : प्लीज,अफवा पसरवू नकोस...! कपिल शर्माने सुनील ग्रोव्हरला सुनावले!!

कपिलच्या या टिष्ट्वटवर सुनील रिअ‍ॅक्ट होणे अपेक्षित होतेच आणि झालेही तसेच. त्यानेही कपिलला त्याच्याच शब्दांत उत्तर दिले. ‘आता लोकांना कळेल की, मी तुझ्या पहिल्या शोमध्ये का परतलो नाही. मी तुझ्या नव्या (फॅमिली टाईम विद कपिल)शोबद्दल बोललोयं आणि तू जुने तेच रडगाणे गातो आहेस. मी एकवर्ष शांत राहिलो. जेणेकरून तुझा असभ्यपणा समोर येऊ नये. तुझी प्रतीमा मलिन होऊ नये. आपण एकत्र खूप चांगले काम केले आहे. आत्ताही फालतू ते बोलणार नाही. लक्षपूर्वक वाच. मी नव्या शोची गोष्ट केली आहे. तू चांगला कॉमेडियन आहेस. सगळ्यांनाच ठाऊक आहे. मी सुद्धा मला येते तितके काम करत राहील आणि हो,लक्ष ठेव. आपल्याला दोन किडनी असतात. पण लीव्हर मात्र एकच असतो. तब्येतीची काळी घे. तुझ्या नव्या शोसाठी शुभेच्छा,’ असे सुनीलने लिहिलेय. 

Web Title: Keep in mind, the kidneys are two and the liver is one ...! Reply to Sunil Grover's Kapil Sharma!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.