Katrina kaifs reaction to losing a game of sequence is viral on internet | गेम हरल्यानंतर असे होते कतरिना कैफचे रिअ‍ॅक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

गेम हरल्यानंतर असे होते कतरिना कैफचे रिअ‍ॅक्शन, सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या पर्सनल लाईफ संबंधीत अनेक फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडे कतरिनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कॅटचा चेहऱ्यावर निराशा दिसते आहे पण लक्ष कॅप्शनवर गेल्यावर तिच्यातील क्युटनेसपण खूप आवडतो आहे. 


 
कतरिना आपल्या मैत्रिणींसोबत गेम ऑफ सीक्वेंस खेळत होती आणि त्यात ती हरली. हरल्यानंतर कतरिना निराश होऊन गालाला हात लावून बसली. तिचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर खूप व्हायरल होतो आहे. 

वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर कतरिनाचा सिनेमा 'सूर्यवंशी' कोरोना काळात असलेल्या लॉकडाऊनमुळे रिलीज होऊ शकला नाही. यात ती अक्षय कुमारच्या अपोझिट दिसणार आहे. याशिवाय तिने 'फोन बूथ' नावाचा सिनेमादेखील साईन केला आहे. यात ती ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. लॉकडाऊनमुळे या सिनेमाचे शूटिंग अडकले होते पण लवकरच आता शूटिंगला सुरुवात होणार आहे. तसेच कतरिना अली अब्बास जफरच्या आगामी सिनेमात सुद्धा दिसण्याची शक्यता आहे. यात ती सुपर व्हुमनच्या भूमिकेत झळकणार आहे. लॉकडाऊनमध्ये सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी या सिनेमाचे शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे. या सिनेमाची अजून अधिकृत घोषणा झालेली नाही.   

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Katrina kaifs reaction to losing a game of sequence is viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.