अभिनेता कार्तिक आर्यनचा काही दिवसांपूर्वी 'पती पत्नी और वो' सिनेमा रिलीज झाला होता. यात त्याच्यासोबत भूमी आणि अनन्या पांडे दिसल्या होत्या. कार्तिक आर्यनचे नाव बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांच्या यादीत सामील आहे. मात्र स्टार बनल्यानंतरही कार्तिक सर्वसामन्य आयुष्य जगतो आहे. काल रात्री कार्तिक दिनेश विजनच्या ऑफिसमध्ये कारने नाही तर रिक्षाने गेला. 


लवकरच कार्तिक ‘लव आजकल 2’मध्ये रोलमध्ये दिसणार आहे. यात तो सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झालेय. ‘लव आजकल 2’ हा सिनेमा 2009 मध्ये आलेल्या सैफ अली खान व दीपिका पादुकोण स्टारर ‘लव आजकल’चा सीक्वल आहे. ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटातही कार्तिकची वर्णी लागली आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ते दोघे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करताना दिसणार आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तब्बूदेखील या चित्रपटात दिसणार आहे.


काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन व सारा अली खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या व्हिडीओमध्ये कार्तिकनं साराला चॅलेंज देत तिला एका सॅन्डलवर वॉक करायला सांगितलं होतं. सारानं एक सॅन्डल काढून वॉक करायला सुरुवात केली. पण या दरम्यान तिचा पाय ड्रेसमध्ये अडकला आणि ती पाय घसरून पडणार होती. मात्र इतक्यात कार्तिक तिचा हात पकडून तिला आधार देत सावरताना दिसला होता.

Web Title: kartik aryaan travel in local auto rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.