kartik aaryans pati patni aur woh beats actors last 4 films in this box office record to emerge highest first weekend grosser | कार्तिक आर्यन की तो निकल पडी! ‘पती पत्नी और वो’ने कमावले इतके कोटी!! 
कार्तिक आर्यन की तो निकल पडी! ‘पती पत्नी और वो’ने कमावले इतके कोटी!! 

‘नॅशनल क्रश’ बनलेला कार्तिक आर्यनचा नुकताच रिलीज झालेला ‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. होय, गत शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या कार्तिकच्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमाने प्रेक्षकांना जणू वेड लावले आहे. याचा परिणाम म्हणजे, ‘पती पत्नी और वो’ने एकाच झटक्यात कार्तिकच्या याआधीच्या चार चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘पानिपत’ या ऐतिहासिक चित्रपटालाही ‘पती पत्नी और वो’ने मात दिली आहे.


‘पती पत्नी और वो’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ९.१० कोटींची कमाई केली. तर दुस-या दिवशी या कमाईमध्ये वाढ होत १२.३३ कोटींची कमाई केली. रविवारी चित्रपटाने १४.५१ कोटींचा गल्ला जमवला आणि चित्रपटाची एकूण कमाई 35.94 कोटींवर गेली. याचसोबत कार्तिकचा हा सिनेमा आत्तापर्यंत रिलीज झालेल्या त्याच्या सर्व सिनेमांच्या यादीत पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
यापूर्वी 2011 मध्ये रिलीज झालेल्या कार्तिकच्या ‘प्यार का पंचनामा’ या सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये 3.25 कोटींची कमाई केली होती. ‘प्यार का पंचनामा 2’ने पहिल्या आठवड्यात 22.75 कोटी कमावले होते. 2018 मध्ये रिलीज ‘सोनू के टीटू की स्वीटी’ने पहिल्या वीकेंडमध्ये 26.57 कोटींची कमाई केली होती.
‘पती पत्नी और वो’ हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत अनन्या पांडे आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत.

‘पानिपत’ने कमावले इतके कोटी
‘पानिपत’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी शुक्रवारी ४.१२ कोटींची, दुस-या दिवशी ५.७८ रुपयांची कमाई केली. रविवारी चित्रपटाने ७.५८ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या एकूण कमाईचा आकडा १७.९ कोटी इतका आहे.

Web Title: kartik aaryans pati patni aur woh beats actors last 4 films in this box office record to emerge highest first weekend grosser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.