Kartik aaryan starrer dhamaka to be release on netflix buy rights in 135 crore | कार्तिक आर्यनची बक्कळ कमाई, नेटफ्लिक्सने 135 कोटींना खरेदी केले सिनेमाचे राईट्स

कार्तिक आर्यनची बक्कळ कमाई, नेटफ्लिक्सने 135 कोटींना खरेदी केले सिनेमाचे राईट्स

 आर्यनने 2011 साली ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आकाशवाणी, कांची द अनब्रेकेबल, प्यार का पंचनामा 2, गेस्ट इन लंडन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमाने तो ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. यानंतर काय तर कार्तिक आर्यन की तो निकल पडी... ​आता कार्तिक त्याच्या पुढच्या 'धमाका' सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. पण कोरोनाने सर्वकाही बदलले आहे आणि याक्षणी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न होता ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. मे महिन्यात हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, नेटफ्लिक्सने 135 कोटी रुपयांत या सिनेमाचे स्ट्रिमिंग राईट्स खरेदी केले आहेत. हा आतापर्यंतचा सगळ्यात महागडा सिनेमा ठरला आहे. निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी यांना हा चित्रपट लवकर रिलीज करायचा आहे.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर सध्या कार्तिकजवळ बरेच चित्रपट आहेत. भूल भूलैया 2 मध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत कियारा आडवाणी दिसणार आहे. तसेच तो दोस्ताना 2 मध्ये जाह्नवी कपूरसोबत दिसणार आहे.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kartik aaryan starrer dhamaka to be release on netflix buy rights in 135 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.