सचिन तेंडुलकरची लेक सारावर बॉलिवूडचा 'हा' अभिनेता झाला लट्टू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 05:01 PM2021-10-13T17:01:41+5:302021-10-13T17:02:57+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची एकुलती एक लाडकी लेक सारा तेंडुलकर सतत चर्चेत येत असते.

Kartik Aaryan reacts on Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar's beautiful 'all smiles' photo | सचिन तेंडुलकरची लेक सारावर बॉलिवूडचा 'हा' अभिनेता झाला लट्टू

सचिन तेंडुलकरची लेक सारावर बॉलिवूडचा 'हा' अभिनेता झाला लट्टू

Next

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) एकुलती एक लाडकी मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) सध्या खूप चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर सक्रिय आहे आणि तिच्या प्रत्येक पोस्टला खूप लाइक्स मिळत असतात. असाच एक फोटो तिने नुकताच इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोने फक्त चाहत्यांनाच नाही तर एका बॉलिवूड अभिनेत्यालाही भुरळ पाडली आहे. 

सारा तेंडुलकर हिने इंस्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बाल्कनीमध्ये उभी दिसते आहे. तिच्या चेहऱ्यावरील स्माईलने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहे. तिचा हा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्याही पसंतीस पडला आहे. त्यानेही हा फोटो लाईक केला आहे. 

सारा तेंडुलकरच्या या फोटोवर आलेल्या कार्तिकच्या लाईकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इतकेच नव्हे, तर बऱ्याच चर्चांना उधाणही आले आहे.  दरम्यान, सारा सध्या मुंबई आणि लंडनमध्ये ये- जा करत असते. मुंबईत तिचे कुटुंब असून, लंडनमध्ये ती वैद्यकिय क्षेत्राचे शिक्षण घेत आहे. मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.

या चर्चांना आलं होतं उधाण
मध्यंतरी ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार अशीदेखील चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सारा एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. कोलकाताचा दमदार फलंदाज व टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिल आणि सारा हे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले गेले होते. दोघांनी एकाच वेळी I SPY असे कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. काही महिन्यांपूर्वी गुगल या सर्च इंजिनवर शुबमन गिलची पत्नी म्हणून सारा तेंडुलकर हिचे नाव झळकले होते. अर्थात WTC फायनलपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत शुबमनने आपण सिंगल असल्याचे सांगून या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला होता.
 

Web Title: Kartik Aaryan reacts on Sachin Tendulkar's daughter Sara Tendulkar's beautiful 'all smiles' photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app