kartik aaryan kiara advani starrer bhool bhulaiyaa 2 movie will release on 19 november | कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' रिलीज डेट आऊट, 'या' दिवशी होणार रिलीज

कार्तिक आर्यन-कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' रिलीज डेट आऊट, 'या' दिवशी होणार रिलीज

कार्तिक आर्यन, तब्बू आणि कियारा अडवाणीची मुख्य भूमिका असलेला 'भूल भुलैया 2' सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचे शूटिंग मागील वर्षी कोरोनामुळे थांबविण्यात आले होते, जे अद्याप सुरू झालेले नाही. सिनेमाचे निर्माता मुराद खेतनी यांनी सिनेमाचे रिलीज डेट जाहीर केली आहे.  हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया या हॉरर-कॉमेडी सिनेमाचा सिक्वल आहे.

सिनेमाचे सह-निर्माता मुराद खेतानी यांनी ट्विट केले की, आम्ही या थ्रिलर कॉमेडीद्वारे पुनरागमन करत आहोत. तुम्ही लोक तयार आहात का?  'भूल भुलैया २' १९ नोव्हेंबर २०२१ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात राजपाल यादव आणि गोविंद नामदेवसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 


वर्क फ्रंटबद्दल बोलयाचे झाल्यास  कियारा अडवाणी 'भूल भुलैया 2' नंतर  सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'शेरशाह'मध्ये दिसणार आहेत.  हा चित्रपट 2 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.  कार्तिक आर्यन याच्याकडे राम माधवानीचा 'धमाका' आणि करण जोहरचा 'दोस्ताना 2' सारखा चित्रपट आहे. सध्या या दोन्ही सिनेमांचं शूटींग सुरू आहे. तर हे सिनेमे पुढील वर्षी रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kartik aaryan kiara advani starrer bhool bhulaiyaa 2 movie will release on 19 november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.