kartik aaryan fan propose him outside his home video viral | तुझ्यासाठी काय पण...!  कार्तिक आर्यनला खुल्लमखुल्ला प्रपोज करणारी ही तरूणी पुन्हा आली चर्चेत

तुझ्यासाठी काय पण...!  कार्तिक आर्यनला खुल्लमखुल्ला प्रपोज करणारी ही तरूणी पुन्हा आली चर्चेत

ठळक मुद्दे कार्तिक आर्यनने 2011 साली ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

कार्तिक आर्यनवर फिदा असणा-या फॅन्सची कमी नाही. तरूणींची तर बातच न्यारी. हँडसम कार्तिकच्या स्टाईलवर लाखो तरूणी फिदा आहेत. अशीच एक तरूणी कार्तिकच्या घरी पोहोचली. यानंतर तिने जे काही केले, ते पाहून तर कार्तिकही थक्क झाला. होय, सध्या कार्तिकसाठी वेड्या असलेल्या या तरूणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तसा हा व्हिडीओ बराच जुना आहे. पण का कुणास ठाऊक पण सध्या तो प्रचंड व्हायरल होतोय.
तर ही तरूणी म्हणजे, कार्तिकवर जीवापाड प्रेम करणारी एक चाहती. कार्तिकला काहीही करून भेटायचेच या वेडाने पछाडलेली. अगदी अनेक तास घराबाहेर ठाण मांडून बसली. अर्थात तरीही कार्तिक काही भेटला नाही. पण अचानक कार्तिकला भेटण्याची तिची इच्छा पूर्ण झाली. 

इतका वेळ वाट का पाहतेस?, असे कार्तिकने तिला विचारले. मग काय, ती लगेच गुडघ्यावर खाली बसली आणि तिने कार्तिकला सर्वांसमोर प्रपोज केले. तिचे हे अनपेक्षित वागणे बघून कार्तिकही थक्क झाला. त्याने हळूच तिला तिचा हात पकडून तिला उभे केले आणि तिच्यासोबत एक मस्त सेल्फी घेतला.
या व्हिडीओवर चाहत्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्यात आहेत. फिल्मी ज्ञान नावाच्या एका इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

 कार्तिक आर्यनने 2011 साली ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर  आकाशवाणी, कांची द अनब्रेकेबल, प्यार का पंचनामा 2,  गेस्ट इन लंडन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमाने तो ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. यानंतर काय तर कार्तिक आर्यन की तो निकल पडी...

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kartik aaryan fan propose him outside his home video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.