कार्तिक आर्यन पुन्हा एकदा क्रिती सनॉनसोबत 'शहजादा' चित्रपटात दिसणार रोमांस करताना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 09:00 PM2021-10-13T21:00:23+5:302021-10-13T21:00:47+5:30

कार्तिक आर्यनने नुकतीच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

Karthik Aryan will once again be seen in the movie 'Shahzada' with Kriti Sanon | कार्तिक आर्यन पुन्हा एकदा क्रिती सनॉनसोबत 'शहजादा' चित्रपटात दिसणार रोमांस करताना

कार्तिक आर्यन पुन्हा एकदा क्रिती सनॉनसोबत 'शहजादा' चित्रपटात दिसणार रोमांस करताना

Next

कार्तिक आर्यन सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या टाइटल्सची अशातऱ्हेने घोषणा करत आहे जशी पुस्तकाची पाने पलटत असावा. रोहित धवन यांच्याद्वारे दिग्दर्शित त्याचा आगामी चित्रपट 'शहजादा'ची घोषणा हा या वर्षीचा त्याच्या तिसरा चित्रपट आहे, ज्यावर तो काम करतो आहे. 

या चित्रपटात तो आपली 'लुका छुपी'ची सह-कलाकार कृति सेननसोबत दिसणार असून अभिनेता अल्लू अर्जुनच्या पावलावर पाऊल टाकायला सज्ज आहे. ज्याने ओरिजनल चित्रपट 'अला वैकुंठपुरमुलु'मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. २०२० मधली सर्वात मोठ्या हिट चित्रपटाला हिंदी दर्शकांसाठी पुन्हा बनवण्यात येत आहे. कार्तिकने या आधी अल्लू अर्जुनच्या 'अला वैकुंठपुरमुलु'मधील गाणे 'बुट्टा बोम्मा'वर एक डांस व्हिडीओ शेअर केला होता आणि आता, 'शहजादा'च्या घोषणेने चाहत्यांचा उत्साह वाढवला आहे.कार्तिक आर्यनने आपल्या सोशल मीडियावर याची घोषणा करताना लिहिले,"#Shehzada जगातील सर्वात गरीब प्रिन्स


'शहजादा' चित्रपटात मनीषा कोइराला आणि परेश रावल हे देखील सहायक भूमिकेत असणार आहेत. आपले टाइटल, टैग लाइन, कार्तिक आर्यन यांच्यामुळे हा रीमेक दमदार होणार आहे. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून ४ नोव्हेंबर, २०२२ ला प्रदर्शित होणार आहे.
कार्तिक आर्यनकडे महत्त्वाच्या चित्रपटांची रांग असून चित्रपटांच्या बॅक टू बॅक घोषणांमुळे ही यादी वाढतच चालली आहे. सध्या त्याच्याकडे 'धमाका', 'भूल भुलैया 2', 'फ्रेडी' आणि 'शहजादा' आदी चित्रपट आहेत.

Web Title: Karthik Aryan will once again be seen in the movie 'Shahzada' with Kriti Sanon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app