बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे आपापसात भांडणं अगदी साहजिक बाब आहे. मात्र सेटवर हाणामारी आणि कडाक्याचं भांडण फार क्वचित पहायला मिळतो. अशीच कॅटफाइट झाली होती अभिनेत्री करिश्मा कपूर आणि रवीना टंडनमध्ये. त्या दोघींमध्ये इतके भांडण झाले की त्या दोघींनी एकमेकींचे केस उपटले होते.  


अभिनेत्री रवीना टंडन आणि करिश्मा कपूर ही जोडी बॉलिवूडमध्ये खूप चर्चेत आली होती. एकत्र दिसणाऱ्या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कधी एकत्र नव्हत्या आणि बरेच वर्ष एकत्र दिसल्यादेखील नाहीत. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका टास्क शोदरम्यान फराह खानने सांगितले की, करीश्मा आणि रवीनामधील नाते किती खराब होते हे मी कसे सांगू.फराह म्हणाली की, इतके कडाक्याचं भांडण आजपर्यंत मी बॉलिवूडमध्ये कधीच पाहिले नाही.


फराहने सांगितले की, आतिश फील द फायर चित्रपटादरम्यान रवीना आणि करीश्मा एका जुन्या भांडणामध्ये गुंतल्या आणि लहान मुलांसारख्या भांडत होत्या आणि एकमेकांचे केस खेचत होते.

फराह म्हणाली की जुन्या भांडणामुळे त्या दोघींनी अंदाज अपना अपना चित्रपटादरम्यान बोलल्या नाहीत आणि शूटिंग पूर्ण केले. एकमेकांसोबत एकही फोटो काढला नाही.
फराह पुढे म्हणाली की, मला जेव्हा हे आठवते तेव्हा खूप हसू येते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भांडणाच्या कित्येक वर्षांनंतर करीश्मा आणि रवीनामध्ये पॅचअप झाले होते. असे म्हटले जाते की अंदाज अपना अपना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान आणि आमीर खान यांची भांडणं पाहून थकले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karisma Kapoor and Raveena Tandon had a heated argument and their hair was pulled out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.