ठळक मुद्देकरिश्माने सांगितले होते की, या सीनच्या चित्रीकरणाला आम्हाला तीन दिवस लागले होते. चित्रीकरण फेब्रुवारीत उटीमध्ये झाले होते. त्याकाळात तिथे प्रचंड थंडी असते. थंडीने अक्षरशः मी कापत होते.

आज किस डे असून बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला किसिंग सीन पाहायला मिळाला आहे. पण राजा हिंदुस्तानी या चित्रपटातील किसिंग सीन नव्वदीच्या दशकात चांगलाच गाजला होता. त्या दशकातील सगळ्यात जास्त कालावधीचा किसिंग सीन म्हणून हा सीन ओळखला जातो. 

राजा हिंदुस्तानी चित्रपटातील हा सीन आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आला होता. या सीनचे चित्रीकरण सुरू असताना करिश्मा अक्षरशः कापत होती असे तिने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले होते. करिश्माने सांगितले होते की, या सीनच्या चित्रीकरणाला आम्हाला तीन दिवस लागले होते. चित्रीकरण फेब्रुवारीत उटीमध्ये झाले होते. त्याकाळात तिथे प्रचंड थंडी असते. थंडीने अक्षरशः मी कापत होते. या सीनचे चित्रीकरण कधी संपेन असे मला झाले होते. कारण प्रचंड थंडी असली तरी आम्ही थंड पाण्यात भिजून या दृश्याचे चित्रीकरण करत होतो. सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सीनसाठी चित्रीकरण करत होतो. 

राजा हिंदुस्तानीमधील हा किसिंग सीन जवळजवळ एक मिनिटांचा होता. आताच्या चित्रपटात आपल्याला इतक्या कालावधीचा किसिंग सीन पाहायला मिळतो. पण त्या काळासाठी हा सीन अतिशय बोल्ड मानला गेला होता. राज हिंदुस्तानी या चित्रपटाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई केली होती. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या अभिनयाचे तर सगळ्यांनी कौतुक केले होते. या चित्रपटासाठी त्या दोघांना पुरस्कार देखील मिळाला होता. या चित्रपटात त्या दोघांशिवाय सुरेश ऑबेरॉय, अर्चना पुरण सिंग, फरिदा जलाल, जॉनी लिव्हर यांच्या मुख्य भूमिका होत्या. 

एक ट्रॅक्सी चालवणारा सामान्य मुलगा आणि अतिशय श्रीमंत मुलीची प्रेमकथा आपल्याला राजा हिंदुस्तानी या चित्रपटात पाहायला मिळाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: karishma kapoor shared experience of filming kiss scene of raja hindustani in ooty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.