बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर तिच्या वर्क कमिटमेेंट्सच्याबाबतील खूप सीरियस असते. तिचे शेड्युल कितीही व्यग्र असलं तरीदेखील ती तिचे कोणतेच प्रोजेक्ट क्लॅश होऊ देत नाही. बऱ्याचदा तिला दोन प्रोजेक्ट्समध्ये ताळमेळ बसवणं शक्य होत नाही. मात्र तिने पुन्हा एकदा प्रोजेक्टसाठी दिलेली कमिंटमेंट पूर्ण केली आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, करीना कपूर एका सिनेमासाठी चंदीगढमध्ये शूटिंग करत आहे. मात्र तिला या चित्रीकरणातून छोटासा ब्रेक घ्यावा लागला आहे. तिचा आगामी चित्रपट गुड न्यूजचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे आणि तिला या इव्हेंटला उपस्थित राहायचे होते. त्यामुळे तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला आणि ती चित्रपटाच्या टीमसोबत उपस्थित राहिली होती. 


तसेच तिच्यामुळे शूटिंगचं नुकसान होऊ नये म्हणून ती एक्स्ट्रा तास शूटिंग करणार आहे. 


गुड न्यूज  या चित्रपटात करीनासोबत अक्षय कुमार, दलजीत दोसांझ व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


अक्षय कुमार व करीना कपूर या जोडीची केमिस्ट्री रसिकांना खूप भावली होती आणि पुन्हा एकदा 'गुड न्यूज' चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

याच दिवशी अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट व रणबीर कपूर, अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. आता प्रेक्षक गुड न्यूज व ब्रह्मास्त्र या दोन्ही पैकी कोणत्या चित्रपटाला जास्त प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena Kapoor will be taking a break for 'Good News'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.