बेबी बम्पचा फोटो शेअर केल्यानंतर करिना कपूरला हवी आहे जॅकलिन फर्नांडिससारखी बॉडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 12:27 PM2020-12-15T12:27:19+5:302020-12-15T12:56:36+5:30

करिना कपूरच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसीचा ग्लो आला आहे.

kareena kapoor wants body like jacqueline fernandez know what says lal singh chaddha actress | बेबी बम्पचा फोटो शेअर केल्यानंतर करिना कपूरला हवी आहे जॅकलिन फर्नांडिससारखी बॉडी

बेबी बम्पचा फोटो शेअर केल्यानंतर करिना कपूरला हवी आहे जॅकलिन फर्नांडिससारखी बॉडी

googlenewsNext

लवकरच आई होणाऱ्या करिना कपूरला हवी आहे जॅकलिन फर्नांडिससारखा फिटनेस. करिना कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. त्यात करिना कपूरचा बेबी बम्प स्पष्ट दिसते आहे. करिनाचा हा फोटो शेअर करताना जॅकलिनने लिहिले, 'ओह माय गॉड, इन्सपायरिंग!' यानंतर करिनाने जॅकलिनची पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'पण जॅकलिन मला तुझ्यासारखे फिटनेस हवं आहे.' अलीकडेच करिना कपूर पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबत धर्मशालाला होती.

जॅकलिन फर्नांडिस 'भूत पोलिस' सिनेमाच्या शूटिंगसाठी धर्मशालामध्ये होती. 'भूत पोलिस'मध्ये जॅकलिन फर्नांडिस सैफ अली खानच्या अपोझिट दिसणार आहे.करिना कपूर खान गेल्या काही महिन्यांपासून तिच्या दुसऱ्या प्रेग्नेन्सीमुळे चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तिने प्रेग्नेन्सीदरम्यानही काम सुरूच ठेवलं आहे. गेल्या महिन्यातच तिने आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' शूटींग पूर्ण केली होती.

अलीकडेच एका टॉक शोमध्ये दरम्यान नेहाने करीनाला तू प्रेग्नेंट असल्याचे समजताच तुझ्या कुटुंबातील किंवा मित्र परिवारापैकी कोणी तुला बाळासाठी नाव सुचवले आहे का? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘तुला खरे सांगू का? तैमूरच्या वेळी त्याच्या नावावरुन जे वाद झाले होता ते पाहून मी आणि सैफने अद्याप बाळाचे नाव ठरवलेले नाही. आम्ही नावाचा विचार नंतर करु आणि तुम्हा सर्वांना सरप्राइज देऊ’ असे करीना म्हणाली.
 

Web Title: kareena kapoor wants body like jacqueline fernandez know what says lal singh chaddha actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.