kareena kapoor shares photo of saif ali khan taimur playing with her second son hides face of little one | सैफ, तैमूर आणि छोटा नवाब...! करिना कपूरने शेअर केला दुसऱ्या मुलाचा फोटो     

सैफ, तैमूर आणि छोटा नवाब...! करिना कपूरने शेअर केला दुसऱ्या मुलाचा फोटो     

ठळक मुद्दे2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता.

करिना कपूरचा (Kareena Kapoor) दुसरा मुलगा कसा दिसतो,  हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याची एक झलक पाहण्याची चाहत्यांची उत्कंठा शिगेला पाहोचली आहे. त्याचे नाव जाणून घेण्याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. पण अद्याप करिनाने आपल्या लाडक्या लेकाचा चेहरा जगाला दाखवलेला नाही. आता करिनाने छोट्या मुलाची एक झलक दाखवणारा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
बेबोने इन्स्टाग्रामवर छोट्या नवाबाचा फोटो शेअर केला आहे. यात बेबोचा तान्हुला बेडवर पहुडलेला आहे आणि सैफ (Saif Ali Khan ) व तैमूर त्याच्यासोबत खेळताना दिसत आहेत. अर्थात या फोटोतही करिनाने बाळाचा चेहरा लपवलेला आहे. बाळाच्या चेह-यावर इमोजी पेस्ट करत, त्याचा चेहरा दिसू नये, याची काळजी घेतली आहे़. (Kareena Kapoor shares photo of her second son)

‘ माझा विकेण्ड काहीसा असा असतो, तुमचा कसा असतो मित्रांनो?,’ असे कॅप्शन करिनाने या फोटोला दिले आहे.   चेहरा दिसत नसला तरी, करिनाच्या बाळाचा हा फोटो सध्या तुफान व्हायरल होतोय.
काही दिवसांपूर्वी आजोबा रणधीर कपूर यांच्या अकाऊंटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यांनी दोन फोटोंचा एक कोलाज पोस्ट केला होता. या फोटोतील बाळ सैफिनाचा मुलगा असल्याचे मानले गेले होते. अर्थात नंतर रणधीर यांनी हा फोटो डिलीट केला होता.


 2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्याने तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटले जाते. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचे नाव ठेवावे, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अद्याप जाहिर केलेले नाही. शिवाय अद्याप त्याचा चेहराही जगाला दाखवलेला नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kareena kapoor shares photo of saif ali khan taimur playing with her second son hides face of little one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.