ठळक मुद्देकरिना म्हणाली होती की, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफने मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं होते, त्यावेळी मी सैफ समोर लग्नानंतर ही चित्रपटात काम करण्याची अट समोर ठेवली होती.

बॉलिवूडची बेबो करिना कपूर आणि छोटे नवाब सैफ अली खान यांचे कपल त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडतं. हे कपल कोणत्या-ना- कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. या दोघांचं लग्न होऊन बराच काळ लोटला आहे. त्यांचा मुलगा तैमुर अली खानला देखील आता त्या दोघांइतकेच फॅन फोलोव्हिंग असून त्याचे विविध फोटो, व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.करिना आणि सैफ यांच्या लग्नाला अनेक वर्षं झाले असले तरी या दोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली हे फार कमी लोकांना माहिती आहे. करिनाने सैफसोबत लग्न करण्यामागे एक खास कारण होते असे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले आहे. हे कारण काय होते हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.टशन सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करिना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. याबाबत करिनानेच एका मुलाखतीत सांगितले होते. करिनाने म्हटले होते की, ''प्रेम व्यक्त करण्यासाठी सैफ कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, हे मला माहिती होते. म्हणून माझ्या परिने मी सर्व ते प्रयत्न केले. खरे तर हे ऐकल्यावर सैफची प्रतिक्रिया काय असेल हेच मला कळत नव्हते. मी प्रेम व्यक्त केल्यानंतर करिना कपूर असे काही करतेय, यावर माझा विश्वासच बसत नव्हता, असे सैफने मला सांगितले होते.

लग्नाच्याबाबतीत करिनाने सांगितले होते की, शूटिंगनिमित्त आम्ही पॅरिसमध्ये एकत्र होतो. त्यावेळेस सैफने मला लग्नासाठी प्रपोज केले होते.एका मुलाखतीदरम्यान करिनाने आपल्या लग्नाबद्दल सांगितले होते. करिना म्हणाली होती की, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफने मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं होते, त्यावेळी मी सैफ समोर लग्नानंतर ही चित्रपटात काम करण्याची अट समोर ठेवली होती. सैफलाही या गोष्टीपासून काही प्रोब्लेम नव्हता. याच कारणामुळे मी सैफसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर काहीच महिन्यात आम्ही लग्नबंधनात अडकलो.  

 

Web Title: kareena kapoor share this secret about saif ali khan and her wedding secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.