ठळक मुद्दे1991 साली सैफ अली खानने अमृता सिंगसोबत लग्न केले होते.2004 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता. 

करिना कपूरने (Kareena Kapoor) सैफ अली खानशी (Saif Ali Khan) लग्न करण्याचा निर्णय सगळ्यांसाठीच धक्कादायक होता. कारण सैफ घटस्फोटित होता. दोन मुलांचा बाप होता. शिवाय करिनापेक्षा वयाने बराच मोठा होत. पण करिना तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेर लग्न झाले आणि करिना कपूर नवाब सैफ अली खानची बेगम बनली. सैफची दुसरी पत्नी बनून घरात आलेल्या करिनाची सैफ व अमृत सिंग (सैफची पहिली पत्नी) यांच्या दोन्ही मुलांशी म्हणजेच सारा व इब्राहिमशी चांगली  बॉन्डिंग आहे. मात्र अमृता सिंगसोबत तिचे नाते कसे आहे? कॉफी विद करण या शोमध्ये करिनाने याबाबत खुलासा केला होता. (Kareena Kapoor  relationship with  Amrita Singh)

‘ सैफला मी पहिल्यांदा भेटले, तेव्हा तो घटस्फोटित होता. अमृता (Amrita Singh)  व त्याचा खूप आधीच घटस्फोट झाला होता. लग्नानंतर आजपर्यंत मी कधीच अमृताला भेटले नाही. पण हो, तिच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे,’ असे तिने यावेळी सांगितले होते.

त्याआधी एका मुलाखतीतही करिना अमृताबद्दल बोलली होती. ‘कभी खुशी कभी गम या सिनेमाच्या सेटवर अमृताने तिच्या मुलीशी माझी भेट घालून दिली होती. तेव्हा सारा खूपच लहान होती. ती माझी व अमृताची पहिली भेट होती. पण यानंतर आत्तापर्यंत आम्ही समोरासमोर प्रत्यक्ष कधीच भेटलेलो नाही. अमृता एक चांगली आई आहे. सारा आणि इब्राहिम या दोघांनाही तिने खूप चांगले संस्कार दिले आहेत. सारा व इब्राहिमसोबत माझी खूप चांगली बॉन्डिंग आहे. आम्ही नेहमी पार्टी करतो. मी त्यांची मैत्रिण बनू शकते. आई नाही. पण हो, त्यांना जेव्हा केव्हा माझ्या मदतीची गरज असेन मी त्यांच्यासाठी नेहमी हजर असेन. सैफने लग्नाआधीच सारा व इब्राहिम त्याच्या आयुष्याचा भाग आहेत, असे मला सांगितले होते. मी त्याच्या या निर्णयाचा आदर केला होता. पुढेही करत राहिन’ असे ती म्हणाली होती.

1991 साली सैफ अली खानने अमृता सिंगसोबत लग्न केले होते.2004 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला होता. 2012 मध्ये सैफने करिनाशी दुसरे लग्न केले. 2016 मध्ये सैफ व करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला. अगदी काही महिन्यांपूर्वीच करिना दुस-यांदा आई झाली.
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kareena kapoor opened big secret about her relationship with sara ali khan mother amrita singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.