kareena kapoor khan spotted with kunal kemmu in an event | VIDEO : कुणाल खेमूसोबत कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली करिना कपूर, दिसली स्टायलिश अंदाजात

VIDEO : कुणाल खेमूसोबत कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाली करिना कपूर, दिसली स्टायलिश अंदाजात

अभिनेत्री करिना कपूर सध्या चांगलीच  चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने एका फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होतो, ज्यात तिचे बेबी बम्प स्पष्ट दिसत होते. करिना बर्‍याचदा पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. करिना कपूरचा एका इव्हेंट दरम्यानचा फोटो व्हायरल होतो आहे.

करिना या इव्हेंटमध्ये मेहुणा कुणाल खेमूसोबत दिसली. दोघे एका रेडिओ शोच्या रेकॉर्डिंग दरम्यान एकत्र दिसले. करिना मॅटरनिटी लीववर जाण्याआधी तिच्या प्रोफेशेनल कमिटमेंट्स पूर्ण करतेय. 

करीना खूपच आकर्षक स्टाईलमध्ये दिसत होती. ती कॅज्युअल टेंजरिन आउटफिटमध्ये दिसली. त्याच्या लूकची बरीच चर्चा होते आहे. करिना तिच्या  फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिचे लूक नेहमीच चर्चेत असतात. तिचा हा लूक देखील चाहत्यांना आवडला आहे. प्रत्येक फोटोमध्ये करिनाच्या चेहऱ्यावर आलेला प्रेग्नेंसीचा ग्लो काही लपून राहत नाही. 

यादरम्यान वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर करिना अखेरची अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांजसोबत 'गुड न्यूज' सिनेमात दिसली होती. आता ती आमीर खानची मुख्य भूमिका असलेल्याा 'लाल सिंह चड्ढा' सिनेमा दिसणार आहे. यासोबतच करिनाने करण जोहरच्या मल्टीस्टारर 'तख्त'मध्येही ती दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kareena kapoor khan spotted with kunal kemmu in an event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.