kareena kapoor khan no make up photo troll people says looking old | करिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......
करिना कपूरने पुन्हा शेअर केला तिचा विना मेकअप लूक, तर युजर म्हणाले.......

विना मेकअप, विस्कटलेले केस अशा अंदाजातला बेबो करिना कपूरचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा फोटो पाहून संमिश्र प्रतिक्रीया दिल्या आहेत. फोटो पाहताच अनेकांनी करिना आता पूर्वीसारखी सुंदर दिसत नसल्याचे कमेंट करत आहेत. तर काहींनी डाएटींग बंद करण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी आंटी दिसत असल्याचे कमेंट केल्या आहेत.  करिना कपूर आपल्या डाएट साठी नेहमीच कॉंशियस असते. झिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत घेतलेय ते सर्वांना ठाऊकच आहे.. सुंदर दिसण्यासाठी करिना खूप मेहनत घेते. मात्र आता करिनाचे सौंदर्य पूर्वीसारखे राहिले नाही त्यामुळे अनेकजण तिचा हा फोटो पाहून निराश होत असल्याचेही पाहायला मिळतंय.


जेव्हा गोष्ट फॅशन आणि स्टाइलची असते, त्यावेळी जास्तीत जास्त लोक बॉलिवूड सेलिब्रिटींना आपला फॅशन आयकॉन मानतात आणि त्यांनाच फॉलो करतात. असचं काहीसं बॉलिवूडची फॅशन आयकॉन असलेल्या करिनाबाबतही असतं. त्यामुळे मेकअपमधले तिचे फोटो पाहून तिचे चाहते तिच्या लूक्सवर फिदा नाही झाले तरच नवल.मात्र आता करिनानेही तिचे विनामेकअप फोटो शेअर केल्यापासून ती अनेकवेळा ट्रोल होत असते. 


मध्यंतरी करीना कपूर इटलीमधील टस्कनीमध्ये सैफ अली खान व तैमूरसोबत फिरायला गेली होती. या करीनाच्या टीमने एक सेल्फी शेअर केला  होता. करीनाने उन्हात हा सेल्फी काढला  होता. या फोटोंमध्ये करीनाने कोणताही मेकअप केलेला नव्हता. या फोटोवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी करीनाच्या वयावर प्रश्न निर्माण केले होते. जवळून काढलेल्या या फोटोमध्ये करीनाचं वय जास्त दिसतंय असं लोकांनी म्हटलं होते.


Web Title: kareena kapoor khan no make up photo troll people says looking old
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.