Kareena Kapoor Khan Becomes the victim of Oops Moment- SRJ | जेव्हा बॉलिवू़डची बेबो ठरली होती Oopps Momentची बळी, पाहा तिचे हे बोल्ड फोटो

जेव्हा बॉलिवू़डची बेबो ठरली होती Oopps Momentची बळी, पाहा तिचे हे बोल्ड फोटो

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं बॉलिवूडची बेगम अर्थात करिना कपूर खानबरोबर. 

आता तिचा एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्थात हा फोटो जुना आहे. या फोटोत बेबो अतिशय सुंदर दिसत असून तिच्या हॉट अदा पाहायला मिळत आहे.
मात्र या फोटोमुळे बेबो OOps मोमेंटलाही बळी ठरली आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्या या फोटोंवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. संपूर्ण इव्हेंटमध्ये ती  गाऊन सावरताना दिसली. इतरांसाठी ती अगदी गॉर्जिअस वाटत होती मात्र तिच्यासाठी हा  डिझायनर ड्रेस  मात्र डोकेदुखी ठरला. संपूर्ण वेळ ती हा ड्रेसच सावरत होती. यामुळे तिच्या चेह-यावर नर्व्हस भाव उमटले होते. 

करिना कपूरने नुकताच इन्स्टाग्रामवर धमाकेदार डेब्यू केला आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले. बघता बघता बेबोच्या फॉलोअर्सची सध्या 17 लाखांवर गेली. पण करिनाच्या इन्स्टा डेब्यूसोबतच एका नव्या वादाची चर्चा सुरु झाली होती. होय, करिना आणि तिची सावत्र लेक सारा अली खान यांच्यात सगळे काही ‘ऑल वेल’ नसल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. या चर्चेची सुरुवात झाली तीच मुळात करिनाच्या इन्स्टा डेब्यूपासून. होय, करिनाने इन्स्टा डेब्यू केल्याकेल्या बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तिला फॉलो केले. करिनाच्या फॉलोअर्समध्ये सारा अली खानचे नाव नाही हे पाहून, दोघींमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Web Title: Kareena Kapoor Khan Becomes the victim of Oops Moment- SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.