kareena kapoor khan and saif ali khan special planning to introduce baby no 2 to the world | करिना कपूर करतेय जोरदार तयारी, छोट्या नवाबाचे लवकरच होणार दर्शन!!

करिना कपूर करतेय जोरदार तयारी, छोट्या नवाबाचे लवकरच होणार दर्शन!!

ठळक मुद्दे 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर बेबो व सैफने कॅमे-याला मस्तपैकी पोज दिल्या होत्या. प्रेग्नंसीदरम्यानही तिने फोटोशूट केले होते. मात्र यावेळी बेबोचा मूड पूर्णपणे वेगळा दिसला.  

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खानच्या घरी आठवडाभरापूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. गत 21 फेब्रुवारीला करिनाने दुस-या पुत्ररत्नाला जन्म दिला. मात्र अद्याप करिनाच्या या मुलाचा कोणता फोटो समोर आला, ना त्याच्या नावाचा खुलासा झाला. पहिल्या मुलाचा म्हणजेच तैमूरचा जन्म झाला त्यावेळी सैफ व करिना काही दिवसानंतरच कॅमे-यासमोर आले होते. तैमूरची झलक त्यावेळी पहिल्यांदा अख्ख्या जगाने पाहिली होती. पण यावेळी मात्र अद्याप तरी बेबोने आपल्या मुलाला जगापासून लपवून ठेवले आहे. पण ही प्रतीक्षा लवकरच संपेल, असे मानले जात आहे.


होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, करीना एका व्हर्चुअल लाईव्ह व्हिडीओ कॉन्फीन्सद्वारे आपल्या बाळाची ओळख करुन देणार आहे. परिणामी चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहेत. महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांची संख्या बघता, तूर्तास तरी मीडियासमोर न येण्याचा निर्णय करिना व सैफने घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे ते आपल्या दुसºया मुलाची एक झलक चाहत्यांना दाखवू शकतात. रिपोर्टनुसार, दुसºया मुलाला जगासमोर आणण्याची जबाबदारी करिनाची असेल. लवकरच बेबो सोशल मीडियावर मुलाचा फोटो आणि त्याच्या नावाचा खुलासा करेल.

 2016 मध्ये तैमूरच्या जन्मानंतर बेबो व सैफने कॅमे-याला मस्तपैकी पोज दिल्या होत्या. प्रेग्नंसीदरम्यानही तिने फोटोशूट केले होते. मात्र यावेळी बेबोचा मूड पूर्णपणे वेगळा दिसला.  
 प्रेग्नेंन्सीच्या काळातही करिना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात होती. बाळाला जन्म दिल्यानंतर करिना पुन्हा एकदा इन्स्टावर अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. प्रसूतीनंतर तिने पहिली पोस्ट केली ती पती सैफ अली खानसाठी. नुकतीच सैफचा आगामी सिनेमा ‘भूत पोलिस’ची रिलीज डेट जाहिर झाली. करिनानने या सिनेमाच्या रिलीज डेटचे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांची मुख्य भूमिका असलेला ‘भूत पोलिस’ येत्या 10 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.  भूत पोलिस हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kareena kapoor khan and saif ali khan special planning to introduce baby no 2 to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.