करीना कपूर बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती तीन सिनेमांमध्ये काम करतेय. याशिवाय एका डान्स रिअॅलिटीशोमध्ये ती जजच्या भूमिकेत दिसतेय. या शोच्या सेटवर करिनाने तिच्या पहिल्या क्रशचे गुपित उघडं केले.  


आजतकच्या रिपोर्टनुसार, शोचा अँकर करण वाहीने करीनाला तिच्या पहिल्या क्रशबाबत प्रश्न विचारला, त्यावर करीना म्हणाली, माझे पहिलं क्रश राहुल रॉयवर होते. यासाठी तिने त्याचा सिनेमा तब्बल 8 वेळा बघितला होता. महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला आशिकी सिनेमा 1990 साली रिलीज झाला होता. यात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांची मुख्य भूमिका होती.    

नुकतेच करीनाने लॅक्मे फॅशन वीक २०१९मध्ये रॅमवॉकवर आपला जलवा दाखवला. गुड न्यूज चित्रपटाबद्दल करीनाने सांगितलं की, हा चित्रपट एण्टरटेनिंग आहे. करीना म्हणाली की, मला वाटतं की मजेशीर व उत्साही सिनेमा आहे.

कारण हा चित्रपट ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा कॉन्सेप्ट खूप वेगळं आहे हा चित्रपट पाहून प्रेक्षक खूप हसतील. गुड न्यूज चित्रपटात एका जोडप्याची कथा रेखाटण्यात आली आहे जे प्रेग्नेंट होण्यासाठी प्रयत्न करत असतात. या चित्रपटात करीनाशिवाय दिलजीत दोसांझ, कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट २७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Web Title: kareena kapoor first crush was rahul roy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.