Kareena Kapoor enjoying vacation in himachal pradesh | हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय करिना कपूर, चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतेय करिना कपूर, चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय प्रेग्नेंसीचा ग्लो

करिना कपूर खान सध्या हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.  करिनासोबत तैमूर आणि सैफ अली खानदेखील आहे. सैफ अली खान सध्या हिमाचलमध्ये 'भूत पोलिस' या सिनेमाचे शूटिंग करतो  आहे आणि करीना हिमाचलमध्ये तिच्या प्रेग्नन्सीचा आनंद घेते आहे.

करीनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये निर्सगाच्या सानिध्यात कॉफीची मजा घेताना बेबो दिसतेय. तिने या फोटोला कॅप्शन देताना लिहिले,  "ब्रेकफास्ट विथ बेबो ... # एफिलिट्रेलाइट."

करीना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोमवारी तिने तिच्या पालमपूर दौर्‍यावरून तिच्या चाहत्यांची एक झलक शेअर केली होती. करीनाने प्रेग्नेंसीतही काम करताना दिसली होती.  प्रेग्नेंसीदरम्यान तिने लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले की प्रेग्नेंसीदरम्यान काम करणे अयोग्य नाही. तिने हेदेखील सांगितले की, तिच्या कुटुंबाने तिला घरी रहायला सांगितले आहे पण तरीदेखील तिला काम करणे गरजेचे वाटते कारण तिला तिचे कमिटमेंट्स पूर्ण करायचे होते. पुढे करिना म्हणाली, जेव्हा मी 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचे शूटिंग करत होते तेव्हा माहित नव्हते की कोरोना संकट येईल. सिनेमाचे शूटिंग एप्रिलमध्ये संपणार होते आणि त्यानंतर मी कोणताच सिनेमा साइन केला नव्हता. प्रेग्नेंट झाल्यानंतर मी माझे सर्व कमिटमेंट्स पूर्ण केल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kareena Kapoor enjoying vacation in himachal pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.