सैफ अली खान आणि करिना कपूर खान बॉलिवूड इंडस्टीतील  मोस्ट पॉप्युलर आणि चार्मिंग कपल्सपैकी एक मानले जातात. या दोघांमध्ये असलेली रोमान्टीक केमिस्ट्री सा-यांच्याच पसंतीस पात्र ठरते. 16 ऑक्टोबर 2012 दिवशी दोघेही लग्नबंधनात अडकले.

डोळे दिपवणा-या नवाबच्या राजेशाही लग्नाची लगबग पाहायला मिळाली.इंडस्ट्रीतील मित्र मंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न थाटात पार पडले.  बेगम करिना आणि नवाबी सैफ यांचा अंदाजही तितकाच खास होता. दोघेही रॉयल अशा अंदाजात यावेळी पाहायला मिळाले होते.  

या लग्नाच्या निमित्ताने सैफचा नवाबी थाट-शान पुन्हा एकदा सा-यांनी अनुभवला होता. लग्नाच्या सात वर्षानंतरही दोघांमध्ये असलेली केमिस्ट्री आजही कायम आहे.  आजही जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात तेव्हा  प्रत्येकाची नजर फक्त सैफीनावरच खिळलेल्या असतात.

सोशल मीडियावर सैफीनाच्या शाही  लग्न सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून सारेच नवाबांची बात न्यारी... नवाबांचे थाट काही औरच.. अशाचे प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच सैफ आणि अमृता सिंग यांचे लग्न 1991 मध्ये झाले होते. या लग्नाला सुरुवातीला सैफच्या घरातून विरोध होता. सैफ आणि अमृता यांच्यामध्ये अमृता 12 वर्षांनी मोठी आहे. पण सैफ अमृताच्या प्रेमात आकंठ बुडाला असल्याने त्याने तिच्यासोबत लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला.

 

त्यांचा घटस्फोट 2004 मध्ये झाला आणि 2012 मध्ये सैफने करिनासोबत लग्न केले. सैफ आणि करिनाच्या लग्नानंतर सैफची मुले सारा आणि इब्राहिम यांचे करिनासोबत खूपच चांगले नाते आहे. त्या दोघांना अनेकवेळा सैफ आणि करिनाचा मुलगा तैमुर अली खान याच्यासोबत देखील पाहाण्यात येते. 


Web Title: On Kareena Kapoor and Saif Ali Khan's anniversary, here's a look back at their wedding photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.