ठळक मुद्देया सर्व फोटोत अनुषा कमालीची बोल्ड दिसतेय. व्हॅकेशनच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडतो आहे.  

अभिनेत्री शिबानी दांडेकर एकीकडे फरहान अख्तरच्या प्रेमात आंकठ बुडालीय. दुसरीकडे शिबानीची बहीण अनुषा दांडेकर ही सुद्धा करण कुंद्राच्या प्रेमात वेडी झालीय. अनुषा दांडेकरकरण कुंद्रा दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ताज्या फोटोत दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. होय, टीव्ही अभिनेता करण कुंद्रा व व्हीजे अनुषा दांडेकर यांची लव्हस्टोरी सध्या तुफान गाजतेय. काही तासांपूर्वी अनुषाने करणसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर केलेत आणि क्षणात व्हायरल झालेत.


या सर्व फोटोत अनुषा कमालीची बोल्ड दिसतेय. व्हॅकेशनच्या या फोटोंवर चाहत्यांच्या लाईक्सचा पाऊस पडतो आहे.  


याआधीही करण व अनुषाने असेच काही रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते. समुद्राकाठी वेळ घालवणे अनुषा व करणला आवडते. समुद्राकाठी बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकणे हा दोघांचाही आवडता छंद आहे. त्यामुळेच दोघांचेही सोशल अकाऊंट व्हॅकेशनच्या फोटोंनी भरलेले आहे.

करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान आहे. गेल्या काही वषापार्सून अनुषा आणि करण एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे बॉडिंग, दोघांचे एकमेकांवरचे असलेले प्रेम वेळोवेळी पाहायला मिळते.


अनुषाच्या प्रेमात पडण्याआधी करण कुंद्रा अनेक वर्षे कृतिका कामराच्या प्रेमात होता.  कितनी मोहब्बत है  या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती.


ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत असे. पण  कितनी मोहोब्बत है  ही मालिका संपल्यानंतर काहीच महिन्यात त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.


कृतिकानंतर करण अनुषाच्या प्रेमात पडला. अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे. अनुष्काचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

Web Title: karan kundra and anusha dandekars romantic photos going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.