करण जोहर हा बॉलिवूडच्या सर्वांत मोठया निर्माता-दिग्दर्शकांपैकी एक मानला जातो. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच सेलिब्रिटी हे घरीच आहेत. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचे व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत आहेत. करण जोहरनेही असाच एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात तो मुलांची उजळणी घेताना दिसतोय. करणने त्याचा मुलगा यशला प्रश्न विचारला असता त्याने दिलेले हे भन्नाट उत्तर ऐकून तुम्हीही लोटपोट झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

लोकप्रिय स्टारकिडमध्ये करणच्या यश आणि रुही कायम चर्चेत असतात. सध्या लॉकडाउनमुळे करण घरात असल्यामुळे दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांसोबत खेळतांना, मस्ती करताना दिसत आहेत. तसंच करण सुद्धा त्याचा जास्तीत जास्त वेळ मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्येच तो खेळखेळता मुलांना काही चांगल्या गोष्टीही शिकवत आहे.

करणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो मुलांच्या अभ्यासाची उजळणी घेत असून तो यशला आपला देश कोणता असा प्रश्न विचारतो. यावेळी खेळण्यात गुंग असलेल्या लहानग्या यशने एक मजेशीर उत्तर दिलं. यश आपला देश कोणता सांग? अशा प्रश्न करणने विचारला. त्यावर अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे आपल्या देशाचं नाव आहे, असं उत्तर यशने दिलं.

दरम्यान, यश लहान असल्यामुळे त्याने असं उत्तर दिलं असलं तरी देखील करणने त्याला आपला देश कोणता, आपल्या देशाचं नाव काय हे नीट समजावून सांगितलं. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे. करण बऱ्याच वेळा त्याच्या मुलांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यामुळे चाहत्यांमध्ये देखील स्टारकिड यश आणि रुही यांची लोकप्रियता पाहायला मिळते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karan Johar reviews children; You too will laugh when you hear Yash's answer 'Hey' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.