Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा करणची झाली एंगेजमेंट, या कारणामुळे करतोय लवकर लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 07:22 PM2022-05-13T19:22:35+5:302022-05-13T19:32:06+5:30

Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने गुपचूप साखरपुडा केला आहे. लवकरच तो विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. आता त्यांनी एका खास कारणासाठी लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Karan Deol Engagement: Sunny Deol's son Karan got engaged, for this reason he is getting married early! | Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा करणची झाली एंगेजमेंट, या कारणामुळे करतोय लवकर लग्न!

Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा करणची झाली एंगेजमेंट, या कारणामुळे करतोय लवकर लग्न!

Next

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल (Karan Deol) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच करणने गर्लफ्रेंड द्रिशासोबत साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे. द्रिषा ही दिवंगत चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसते आहे.

धर्मेंद्र यांच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे सनी देओलने मुलगा करण आणि द्रिषाचा गुपचूप साखरपुडा केला. ज्यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. दोन्ही कुटुंबात त्यांच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे लग्न लवकरात लवकर पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून ते घरी आले आहेत. कुटुंबीय त्याची पूर्ण काळजी घेत आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण आणि द्रिषा खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते बऱ्याचदा एकमेकांसोबत वेळ व्यतित करताना दिसले आहेत. मात्र, ते दोघेही त्यांच्या नात्याबद्दल मीडियासमोर कधीही उघडपणे बोलले नाहीत. करणच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याने २०१९ मध्ये 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. त्याच्या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. सध्या करण त्याचा आगामी चित्रपट 'अपने २'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याचे वडील आणि आजोबा धर्मेंद्रही त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.

Web Title: Karan Deol Engagement: Sunny Deol's son Karan got engaged, for this reason he is getting married early!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app