बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री राखी यांचा जन्म ज्या दिवशी देश स्वातंत्र्य झाला म्हणजेच 15 ऑगस्ट, 1947 साली झाला. आज त्यांनी 73वा वाढदिवस साजरा केला. सध्या त्या बॉलिवूडमधून गायब आहेत. त्या सध्या पनवेलमध्ये असून तिथे शेती करत आहेत.  
अभिनेत्री राखीच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. राखीला शिक्षण घ्यायचे होते. तिला शास्त्रज्ञ व्हायचे होते. मात्र कुटुंबाची परिस्थिती चांगली नव्हती. कमी वयातच बांगला सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. 20 व्या वर्षी राखीने बॉलिवू़डमध्ये पदार्पण केले. 'जीवन मृत्यू' हा राखी यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर अनेक ऑफर्स आल्या होत्या. ‘शर्मिली’, ‘लाल पत्थर’, ‘आँचल’, ‘कसमे वादे’, ‘कभी कभी’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.


मेरे करण- अर्जुन आएंगे…., असं म्हटलं की राखी यांचाच चेहरा सर्वांसमोर येतो आणि तेव्हाच एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवणारी ही अभिनेत्री सध्या काय करत असेल, हा प्रश्नही अनेकांच्याच मनात घर करतो. चित्रपट विश्वात राखी यांना जितके यश मिळाले तितक्याच त्या खासगी आयुष्यात अपयशी ठरल्या. गीतकार गुलजार यांच्याशी लग्न बेडीत अडकल्यानंतर राखी यांनी चित्रपटांमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर मात्र त्यांच्या नात्याला तडा गेला आणि गुलजार- राखी वेगळे झाले. नात्यांमध्ये आलेल्या या वादळाने त्यांच्या आयुष्यावर बराच परिणाम केला. राखी आणि गुलजार यांनी घटस्फोट घेतला नसून, ते फक्त वेगळे झाले आहेत असे सांगितले जाते.


अभिनेत्री राखी यांनी चित्रपटात काम करून मजा येत होती तोपर्यंत त्यांनी काम केलं त्यानंतर काम करणे बंद केले. आता त्या मुंबई जवळ असलेल्या पनवेलमध्ये शेती सुरू केली आहे.

आपल्या फार्म हाऊसमध्ये गाय, घोडे, कुत्रा आणि अनेक प्राणी पाळले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Karan-Arjun's mother is missing from Bollywood, this is what they are doing now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.