Kangana rushed to Ranaut's house! Sharing Video - 'First Wedding Invitation' | कंगना राणौतच्या घरी लगीनघाई! व्हिडीओ शेअर करत म्हणाली - 'लग्नाचं पहिलं निमंत्रण'

कंगना राणौतच्या घरी लगीनघाई! व्हिडीओ शेअर करत म्हणाली - 'लग्नाचं पहिलं निमंत्रण'

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना राणौतच्या घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहे. ही माहिती देत कंगना राणौतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल होताना दिसतो आहे. इतकेच नाही तर हा व्हिडीओ चाहत्यांना खूप भावतो आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या सोशल मीडियावर लग्नाच्या तयारीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.  या फोटोमध्ये कंगना ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे. ती साडी नेसली आहे आणि तिनं ज्वेलरी घातली आहे.  

कंगनाचा भाऊ अक्षतचे लग्न होणार आहे. त्यासाठी बधाईचा कार्यक्रम झाल्याचे कंगनाने सांगितले. 


कंगना म्हणाली की, बधाई ही हिमाचल प्रदेशमधील परंपरा आहे. यामध्ये लग्नाचं सर्वात पहिलं निमंत्रण मामा-मामीला दिलं जातं. कंगनाच्या आईच्या माहेरी म्हणजे आजी-आजोबांकडे हा कार्यक्रम झाला. अक्षतचे लग्न नोव्हेंबरमध्ये होणार आहे. बधाईचा कार्यक्रम झाल्यानंतर आता सर्वांना निमंत्रण दिलं जाणार आहे.


कंगना राणौतने हळदी सेरेमनीचा व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिची मोठी बहिण रंगोली चंडेलदेखील दिसते आहे. २०१९ मध्ये अक्षतचा साखरपुडा झाला होता.

ज्याचा फोटो व व्हिडीओ कंगनाने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. या व्हिडीत दोन्ही बहिणी आपल्या भाभींसोबत हिमाचलमधील ट्रेडिशनल डान्स करताना दिसल्या होत्या.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kangana rushed to Ranaut's house! Sharing Video - 'First Wedding Invitation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.