कंगना रणौतच्या चित्रपटात दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 11:25 AM2017-07-26T11:25:02+5:302017-07-26T17:13:20+5:30

कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात तिच्या सोबत एका मराठमोळा कलाकर दिसणार आहे. कंगना रणौत या ...

Kangana Ranaut will appear in 'Hai' Maratha face! | कंगना रणौतच्या चित्रपटात दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा!

कंगना रणौतच्या चित्रपटात दिसणार 'हा' मराठमोळा चेहरा!

googlenewsNext
गना रणौतच्या 'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात तिच्या सोबत एका मराठमोळा कलाकर दिसणार आहे. कंगना रणौत या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे तर पवित्र रिश्ता फेम अंकिता लोखंडे झलकारी बाईच्या भूमिकेत.पिंकवलाच्या रिपोर्टनुसार यात तात्या टोपेंच्या (रामचंद्र पांडुरंग टोपे) भूमिकेत अतुल कुलकर्णी झळकणार आहे. कंगना आणि अंकितासोबत अतुल पण घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतो आहे. आपल्या भूमिकेबदल बोलताना अतुल म्हणाला, ''अशी भूमिका मी या आधी कधीच केली नाही आहे. मी यात तलवारबाजीचे स्टंट स्वत: करणार आहे.''



नुकतीच तलवारबाजीचा सीन करताना कंगना जखमी झाली होती. कंगना या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये करत आहे. या चित्रपट फायटिंग सीन शूट करताना कंगनाच्या नाकावर जखम झाली होती.मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाच्या टीमने तिला अपघातानंतर लगेच रुग्णालयात दाखल केले. कंगनाला 15 टक्के पडले होते. सध्या कंगनाला डॉक्टरांच्या देखरेखेखाली रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे.अभिनेता निहार हा कंगनावर तलवारीने आघात करतो असा हा सीन होता.मात्र निहारने केलेल्या आघाताचं टायमिंग चुकलं आणि हा आघात कंगणाच्या कपाळावर पडला. या आघातामुळे कंगणा गंभीर जखमी झाली.

ALSO READ : कंगना राणौतने ‘नेपोटिझम’वर ओपन लेटर लिहित सैफ अली खानला पाजले डोस!  

निर्माता कमल जैनचे म्हणणे आहे  कंगनाला या फायटिंग सीन स्वत:चा शूट करायचा होता तिन डबलची मदत घेण्यासाठी नाकार दिला. त्याच दरम्यान तिच्यासोबत हा अपघात घडला. कंगनाने या आधी कधीच घोडेस्वारी आणि तलवारबाजी केली नव्हती. घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेत्यानंतर तिने हॉलिवूडचा अॅवॉर्ड विनिंग स्टंट डायरेक्टर निक पॉवेलकडून तलावरबाजीचे प्रशिक्षण घेतले. प्रत्येक विकेंडला कंगना निक पॉवेल तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत होती. 

Web Title: Kangana Ranaut will appear in 'Hai' Maratha face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.