kangana ranaut attacks on bollywood celebrities calls them hyenas who are against media | बॉलिवूडमधील सर्व लांडगे...! न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणाऱ्या सलमान-शाहरूखवर कंगना बरसली

बॉलिवूडमधील सर्व लांडगे...! न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणाऱ्या सलमान-शाहरूखवर कंगना बरसली

ठळक मुद्देन्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणा-या बॉलिवूडकरांवर याआधीही कंगनाने टीका केली होती. 

बॉलिवूडला लक्ष्य करण्याची एकही संधी न सोडणारीअभिनेत्री कंगना राणौत हिने पुन्हा इंडस्ट्रीवर जोरदार टीका केली आहे. आधी सुशांत प्रकरणावरून कंगनाने इंडस्ट्रीला लक्ष्य केले. मग महाराष्ट्र सरकारसोबतचा तिचा पंगा  आणि आरोपप्रत्यारोपांची चर्चा झाली. आता कंगनाने मीडिय हाऊसेसविरोधात कोर्टात  जाणाऱ्या बॉलिवूड दिग्गजांवर तोंडसुख घेतले आहे. बॉलिवूडमधील लांडगे वृत्तमाध्यमांविरोधात एकत्र आले, अशी टीका तिने केली आहे.
बेजबाबदार, अपमानास्पद वृत्तांकन करणा-या दोन टीव्ही वाहिन्यांविरोधात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर  यांच्या विरोधात या सर्वांनी एकत्र येऊन याचिका दाखल केली आहे. नेमक्या याच मुद्यावर कंगनाने एक व्हिडीओ जारी केला.

या व्हिडीओत काही वर्कर्स फिल्मच्या सेटवर काम करत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना कंगनाने मीडियाविरोधात कोर्टात जाणा-यांना लांडग्यांची उपमा दिली आहे.  ‘बॉलिवूडमधील सर्व लांडगे एकत्र आलेत आणि आता मीडियावर हल्ला करण्याची तयारी करत आहेत. मजुरांवर, शेतक-यांवर, महिलांवर, देशातील गरिबांवर अन्याय होतो, त्यावेळी हे लोक कुठे जातात? आज ही मंडळी मानवाधिकाराच्या बाता मारताहेत, पण इतरांच्या हक्कांवर गदा येते तेव्हा हे मूग गिळून गप्प बसतात,’ अशा शब्दांत कंगनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

सगळ्यांचे पितळ उघडे पाडत राहीन...

न्यूज चॅनल्सविरोधात कोर्टात जाणा-या बॉलिवूडकरांवर याआधीही कंगनाने टीका केली होती.  बॉलिव़ूड ड्रग्स, शोषण, नोपोटिझम आणि जिहादचे गटार बनले आहे. मात्र त्याला साफ करण्याऐवजी बॉलिवूड स्ट्राइक्स बॅकसारख्या हॅशटॅगचा वापर केला जात आहे. मी तर म्हणते माझ्यावरही खटला दाखल करा. जोपर्यंत जिवंत राहीन तोपर्यंत तुम्हा सगळ्यांचे पितळ उघडे पाडत राहीन, असे कंगना म्हणाली होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना राणौतने मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारवरही बोचरी टीका केली होती. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत तिने शिवसेनेशीही पंगा घेतला होता. मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. त्यामुळे एका नव्या वादास तोंड फुटले होते.

टीचर, टीचर, वो अर्नब मुझे गाली दे रहा है...! ‘बॉलिवूड स्ट्राईक बॅक’ची राम गोपाल वर्मांनी उडवली खिल्ली

‘ते’ ट्विट पडले महागात, कंगना राणौतविरोधात कर्नाटकात गुन्हा

दोन चॅनल्सविरोधात ‘बॉलिवूड’ कोर्टात

बॉलिवूडमधील लोक अमली पदार्थांचे व्यसनी तसेच मलीन प्रतिमेचे आहेत, असा उल्लेख टाइम्स नाऊ, रिपब्लिक टीव्हीने सुशांतसिंह राजपूत प्रकरणी करून बेजबाबदार पद्धतीने वृत्तांकन केले, अशा तक्रारी करणारी याचिका आमीर खान, शाहरूख खान, सलमान खान, अजय देवगण आदी दिग्गज कलाकार व निर्माते, चित्रपट क्षेत्रातील विविध संघटनांनी केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे.या प्रकरणात दाद मागणाऱ्यांमध्ये करण जोहर, आदित्य चोप्रा, फरहान अख्तर आदी नामवंतांचाही समावेश आहे. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी तसेच टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर, नविकाकुमार यांच्या विरोधात न्यायालयात या कलाकारांनी दाद मागितली आहे. या वृत्तवाहिन्यांनी बॉलिवूडसाठी ओंगळ, व्यसनी अशा अपशब्दांचा वापर चालविलेला आहे, असा आरोप या याचिकेत आहे. बॉलिवूडमध्ये घाण असून ती साफ करण्याची गरज आहे, अशी प्रक्षोभक भाषा या वृत्तवाहिन्यांनी वापरल्याचा आरोप केला आहे. सुशांतप्रकरणी माध्यमांनी कायद्याचा भंग होईल, असे वृत्तांकन करू नये, असा आदेश द्यावा, अशी विनंती केलीे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kangana ranaut attacks on bollywood celebrities calls them hyenas who are against media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.