kamal rashid khan aka krk negative tweets about sushant singh rajput are viral | सुशांत सिंग राजपूतला केआरकेने केले होते सर्वाधिक ट्रोल, आता नेटकरी घेत आहेत क्लास

सुशांत सिंग राजपूतला केआरकेने केले होते सर्वाधिक ट्रोल, आता नेटकरी घेत आहेत क्लास

ठळक मुद्देसुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीवर कंगना राणौत, अभिनव कश्यप रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी वक्तव्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी (15 जून) आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. त्याच्या अचानक एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र, यासोबतच बॉलिवूड पुन्हा एकदा घराणेशाहीचा वाद उफाळून आला आहे. एकीकडे सोशल मीडियावर करण जोहर, सलमान खान सारख्या सेलिब्रेटींना सुशांतच्या आत्महत्येनंतर  ट्रोल केले जात आहे. दुसरीकडे सुशांतबद्दलचे अनेक जुने व्हिडीओ व  पोस्ट व्हायरल होत आहेत. ज्यांनी सुशांतची खिल्ली उडवली होती, असे काही जण नेटक-यांच्या निशाण्यावर आले आहेत. यातलेच एक नाव म्हणजे कमाल खान उर्फ केकेआर.

केकेआर एक अभिनेता आहे. सोबत तो स्वत:ला मोठा समीक्षकही मानतो. सुशांतच्या जुन्या चित्रपटांची समीक्षा करताना केआरके सुशांतबद्दल खूप काही वाईट बोलला होता. त्याचे ते सगळे ट्विट व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांनी केआरकेला अक्षरश: झोडपून काढले आहे.

सोशल मीडियावर केआरकेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तो सुशांतला नाही नाही ते बोलताना दिसतोय. ‘सुशांतला अ‍ॅक्टिंग येत नाही. अशा अभिनेत्यांना 8 कोटी चार्ज करणा-यांवर फाइन ठोकायला हवा. 8 लाखांची लायकी असलेल्या कलाकाराना 8 कोटी देत असाल तर तो स्वत:ला शाहरूख खान समजू लागेल,’ असे केआरके सुशांतबद्दल म्हणतोय/
या व्हिडीओशिवाय केआरकेने सुशांतबद्दल केलेले ट्विटही व्हायरल झाले आहेत. यातही सुशांत एक सुमार अभिनेता असल्याचे केआरके म्हणतोय.
चाहत्यांनी या सर्व ट्विटचे स्क्रिनशॉट्स शेअर करत केआरकेला फैलावर घेतले आहे.

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर आतापर्यंत बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीवर कंगना राणौत, अभिनव कश्यप रवीना टंडन, शेखर कपूर यासारख्या सेलिब्रेटींनी वक्तव्य केले आहे. त्यानंतर आता सलमान खान, करण जोहर यांच्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 .


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kamal rashid khan aka krk negative tweets about sushant singh rajput are viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.